दोन जेसीबी मशीनसह तीन बोटी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:34 PM2017-09-18T23:34:18+5:302017-09-18T23:34:37+5:30
वर्धा नदीवर हिंगणघाट तालुक्यातील कारेगाव या रेतीघाटावर विनापरवाना रेतीचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलच्या कर्मचाºयांना मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा नदीवर हिंगणघाट तालुक्यातील कारेगाव या रेतीघाटावर विनापरवाना रेतीचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलच्या कर्मचाºयांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी या घाटावर धाड घालून रेतीचा उपसा करण्याकरिता असलेले दोन जेसीबी आणि तीन बोटी जप्त केल्या आहेत. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली. या प्रकरणी घाटमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्धा जिल्ह्यातील रेतीघाट अनेक अधिकाºयांसह इतरांकरिता आर्थिक व्यवहारांचे साधन बनले आहे. जिल्ह्यातील अनेक रेतीघाटांवर विना परवानगी रेतीचा उपसा करण्यात येत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. याची माहिती महसूल विभागासह पोलिसांना असतानाही त्यांच्याकडून कारवाई करण्यात नाही. असाच प्रकार कुरन येथील रेतीघाटावर होत असल्याची माहिती मिळताच येथे धाड घालण्यात आली. येथे दोन जेसीबी मशील आणि तीन बोटी जप्त करण्यात आल्या. जप्त केलेली साधनसामुग्री तहसील कार्यालयात आणण्यात येत आहे.
कारवाई करण्यात आलेल्या या घाटधारकाचे नाव संतोष पनपालिया असे असून मशीन मालक चेतन डहाके व गणेश लाखे हे आहेत. सदर कारवाई जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अपर जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार सचिन यादव व महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या चमूने केली. या मोहिमेत नायब तहसीलदार अजय झिले, मंडळ अधिकारी उके, भोपे व तलाठी चंदनखेडे, कडू, इंगळे व कनिष्ठ लिपिक राजीव बदड, शिपाई अनिल भेदूरकर व वाहन चालक शेख सहभागी होते.
महसूल विभागाने एका रेती घाटावर कारवाई केली. असे अनेक रेतीघाट जिल्ह्यात सुरू आहेत. त्या घाटांवर कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी देण्याची गरज आहे.