आष्टी तालुक्यातील तिन्ही तलाव पडणार कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 01:06 AM2017-09-13T01:06:51+5:302017-09-13T01:06:51+5:30

 Three lanes of Ashti taluka will fall dry | आष्टी तालुक्यातील तिन्ही तलाव पडणार कोरडे

आष्टी तालुक्यातील तिन्ही तलाव पडणार कोरडे

Next
ठळक मुद्देकपिलेश्वर तलावात २४ टक्के जलसाठा : अत्यल्प जलसाठ्यामुळे सिंचनाची समस्या उद्भवणार

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : यावर्षी पावसाळा होऊन तीन महिने पूर्ण झाले. चवथा महिना अर्धा संपला. मात्र पावसाने दांडी मारल्याने जिल्ह्याने पावसाची सरासरीही गाठली नाही. तालुक्यातील प्रमुख तीन तलावातील जलसाठा कोणत्याही क्षणी आटण्याची शक्यता आहे. आष्टी तलावात २४ टक्के, पिलापूर तलाव २२ टक्के तर मलकापूर तलावात ३० टक्के जलसाठा आहे. पावसाची स्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात हे तीनही तलाव तळ गाठणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेतकºयांना रब्बीसाठी एकाही फेरीची सोय होणार नसल्याचे चित्र आहे.
निसर्गाच्या पायथ्याशी वसलेल्या आष्टी शहराभोवताल चारहीबाजुंनी टेकड्या आहे. याठिकाणी शहराला लागूनच कपिलेश्वर तलाव आहे. पर्यटनासाठी प्रलंबित असलेल्या तलावावर मोठ्या संख्येने नागरिक फिरायला येतात. तलावाची भिंत मोठी आहे. बाजुला ओलीतासाठी सोडण्यात येणाºया पाण्याचा नहर आहे. मात्र सर्वकाही ओसाड पडले आहे. गत वर्षी पावसाळा झाल्यावर अवघा ११ टक्के जलसाठा शिल्लक होता. यावर्षी सध्या एकूण २४ टक्के साठा संचयित आहे. तलावाच्या आतील उंचवटे उघडे पडल्याने चहुबाजुने दगड दिसत आहे. यावरुन यंदाचा उन्हाळा किती बिकट राहील याचा अंदाज येत आहे. पावसाळा संपायला अवघे १५ दिवस बाकी आहे. त्यामुळे पाणी आले नाही तर उपलब्ध साठा कमी होणार आहे.
मलकापूर तलावात यंदा २२ टक्के जलसाठा आहे. एकूण ३० टक्के मध्ये तलावाचे तळ झाकलेले दिसत आहे. पिलापूर तलावात गत वर्षी १२ टक्के व यावर्षी १० टक्के जलसाठा झाला आहे. तालुक्यातील तिनही तलावाच्या जलसाठ्यामुळे रबी पिकाचे २५ टक्के क्षेत्र घटणार आहे. सिंचनासाठी पाणीच नसल्यावर शेतकरी काय करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तलावातील पाणीसाठ्याचा फटका मच्छीमारांनाही बसला आहे. आजुबाजूला वाहणाºया नद्या, नाले पाणी कमी पडल्याने कोरड्या झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होणार आहे.

कपिलेश्वर, मलकापूर व पिलापूर या तिनही तलावाची पाणी पातळी २४ टक्क्यावर आल्याने संकट आणखी गडद होईल. शेतकºयांना पिण्याचे व सिंचनाचे पाणी मिळण्याची शक्यता नाही. येत्या १५ दिवसात पाणी येथे अपेक्षित आहे.
- चंद्रशेखर पोटे, तांत्रिक सहाय्यक पाटबंधारे उपविभाग आष्टी

Web Title:  Three lanes of Ashti taluka will fall dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.