बाजारगाव स्फोटात वर्धा जिल्ह्यातील तिघींचा समावेश,कारंजा तालुक्यात शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 04:24 PM2023-12-17T16:24:48+5:302023-12-17T16:25:29+5:30

मिळालेल्या माहितीनुसार स्वताली दामोदर मारबते (२१) रा. कन्नमवारग्राम, रुमिता विलास उईके (२४) रा. ढगा आणि पुष्पा श्रीराम मानापुरे (४०) रा. कारंजा असे मृतकाची नावे आहे. पु

Three people from Wardha district were involved in the Bazargaon blast, mourning in Karanja taluka | बाजारगाव स्फोटात वर्धा जिल्ह्यातील तिघींचा समावेश,कारंजा तालुक्यात शोककळा

बाजारगाव स्फोटात वर्धा जिल्ह्यातील तिघींचा समावेश,कारंजा तालुक्यात शोककळा

कारंजा (घाडगे) (जि.वर्धा) : नागपूर जिल्ह्यातील बाजारगावच्या सोलर कंपनीत झालेल्या स्फोटात वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील तिघींना जीव गमवावा लागला. त्यामुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्वताली दामोदर मारबते (२१) रा. कन्नमवारग्राम, रुमिता विलास उईके (२४) रा. ढगा आणि पुष्पा श्रीराम मानापुरे (४०) रा. कारंजा असे मृतकाची नावे आहे. पुष्पा ही गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून मुला-मुलीसह कारंजा येथील वडील बलराम नासरे यांच्याकडेच राहत होती. ती नियमित या कंपनीत कामाला जाऊन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवित होती. आज तिचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने दोन्ही मुले पोरकी झाली आहे. कारंजा तालुक्यातील कन्नमवारग्राम, बांगडापूर, ढगा व लगतच्या परिसरात या सोलर कंपनीची नियमित बस येतात. 

आज सकाळी स्वताली व रुमिता या दोघीही कंपनीत गेल्या होत्या. सकाळी ९ वाजता या कंपनीत स्फोट होऊन कर्मचाºयांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांच्या कानावर धडकली. तसेच सर्वांनी हातातील काम सोडून कंपनीकडे धाव घेतली. या दोघींच्या घरातील परिस्थिती जेमतेम असल्याने परिवाराला आधार व्हावा, म्हणून या दोघीही या कंपनीत काम करायच्या. या घटनेमुळे कन्नमवारग्राम व ढगा या दोन्ही गावात शोककळा पसरली आहे. दोघींचेही परिवार घटनास्थळी गेल्याने गावात शुकशुकाट आहे.

Web Title: Three people from Wardha district were involved in the Bazargaon blast, mourning in Karanja taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर