पाईप चोरणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 05:00 AM2022-01-07T05:00:00+5:302022-01-07T05:00:44+5:30
धाम नदीपात्रातून सेवाग्राम रेल्वे स्थानक परिसरापर्यंत मध्य रेल्वेकडून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. मात्र, काहींकडून ही पाईपलाईन फोडून चोरुन नेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या निर्देशानुसार आरपीएफचे निरीक्षक विजयमुकार त्रिपाठी, उपनिरीक्षक के.एन. राय यांच्या नेतृत्वात रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी प्रभारी आरक्षक रमाकांत चौधरी, तडवी, डी.बी.शिंदे, आरक्षक मुश्ताक यांनी घेराव घालून तिघांना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेवाग्राम येथील रेल्वेस्थानक परिसरात टाकण्यात आलेली बीडची जलवाहिनी फोडून चोरी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी सापळा रचून तीन अट्टल चोरट्यांना पकडून बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून पाईपलाईनचे साहित्य जप्त केले.
धाम नदीपात्रातून सेवाग्राम रेल्वे स्थानक परिसरापर्यंत मध्य रेल्वेकडून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. मात्र, काहींकडून ही पाईपलाईन फोडून चोरुन नेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या निर्देशानुसार आरपीएफचे निरीक्षक विजयमुकार त्रिपाठी, उपनिरीक्षक के.एन. राय यांच्या नेतृत्वात रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी प्रभारी आरक्षक रमाकांत चौधरी, तडवी, डी.बी.शिंदे, आरक्षक मुश्ताक यांनी घेराव घालून तिघांना अटक केली. ही कारवाई रेल्वे पोलीस अधीक्षक आशुतोष पांडेय यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
३ दिवसांची आरपीएफ कोठडी...
आरोपी चोरट्यांविरुद्ध सेवाग्राम आरपीएफ ठाण्यात गुन्हा दाखल करुन वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त व सह सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनात तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता तिघांनाही तीन दिवसांची आरपीएफ कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तसेच उर्वरित दोन आरोपी फरार असून त्यांचीही माहिती जाणून घेतली जात आहे.
२०० किलोचे साहित्य पोलिसांनी केले हस्तगत
तीन चोरटे पाईप फोडत असल्याचे दिसून आले. तसेच ते साहित्य पोत्यांत भरुन घेऊन जात होते. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी रेल्वेची संपत्ती चोरल्याची कबुली दिली. उपनिरीक्षक राय, रमाकांत चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ४ पोत्यांतील ८ हजार रुपये किमतीचे २०० किलो साहित्य हस्तगत केले. आरोपींनी यापूर्वीही इतर दोन आरोपींसह पाईप फोडून चोरुन नेत वर्ध्यातील एका भंगार व्यावसायिकाला विकल्याची माहिती दिली.