वीजजोडणीचे तीन हजार अर्ज प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 11:40 PM2019-04-07T23:40:33+5:302019-04-07T23:41:04+5:30

शेतकरी कृषीपंपाच्या वीजेचे देयक नियमित भरत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीला दरवेळी मोठा फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांची यातून सुटका करण्यासाठी सौर उर्जेवरील कृषीपंप देण्याची योजना लागू करण्यात आली आहे.

Three thousand applications for electricity connection pending | वीजजोडणीचे तीन हजार अर्ज प्रलंबित

वीजजोडणीचे तीन हजार अर्ज प्रलंबित

Next
ठळक मुद्देसौर ऊर्जेचे कनेक्शन देण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकरी कृषीपंपाच्या वीजेचे देयक नियमित भरत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीला दरवेळी मोठा फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांची यातून सुटका करण्यासाठी सौर उर्जेवरील कृषीपंप देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी अर्ज केले आहेत. त्यांचे जवळपास ३ हजार २७७ अर्ज वर्धा जिल्ह्यात प्रलंबित असल्याची माहिती पुढे आली आहे.
शेतीच्या ओलितासाठी कृषीपंपाना वीज जोडणी देण्याचे काम महावितरणने गेल्यावर्षीपासून बंद केले आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून विहिरी खोदल्या, शासकीय योजनेतून विहिरी मिळविल्या त्या शेतकºयांना आता ओलितासाठी विद्युत पुरवठा दिला जात नाही. महावितरणकडे या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. मात्र, त्यांचे अर्ज प्रलंबित पडून आहे. मार्च २०१८ पासून शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज देणे बंद झाले असल्याने राज्यासह वर्धा जिल्ह्यातही शेतकरी अडचणीत आले आहे. महावितरणने सौर उर्जेच्या माध्यमातून कृषीपंपांना वीज पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित केली आहे. शेतकऱ्यांना सौर उर्जेच्याद्वारे कृषीपंपांचे ओलित होऊ शकते. हे दाखविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात काही ठराविक गावांमध्ये शेतकºयांच्या असे पंप लावून देण्यात आले आहे. ते शेतकरी इतर शेतकऱ्यांना सौर उर्जेवरील पंपांद्वारे ओलित होऊ शकते, हे दाखवून देत आहे. त्यामुळे आता ३ ते ४ लाख छोट्या शेतकऱ्यांना सौर उर्जेवरील पंप घ्यावा लागणार आहे. यातील ५ ते १० टक्के रक्कमही त्यांना भरावी लागेल. या योजनेतून कृषीपंपाची होणारी थकबाकीची कटकट महावितरण कंपनीकडे राहणार नाही. सौर उर्जेवरील पंपांमुळे शेतकऱ्यांना एकदा खर्च केल्यावर नेहमीसाठी मोफत वीज उपलब्ध होईल. २४ तास शेतीसाठी वीज पुरवठा सुरू राहील. त्यामुळे महावितरणाचे अधिकारी सौर कृषीपंपांचे महत्व शेतकऱ्यांना समजावून देत आहे. राज्यात सौर कृषीपंपासाठी सुमारे १.२७ लाख शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहे. वर्धा जिल्ह्यातील १०० वर शेतकऱ्यांचा यात समावेश आहे.

Web Title: Three thousand applications for electricity connection pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज