तीनचाकी मालवाहूची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:33 AM2019-02-14T00:33:00+5:302019-02-14T00:34:16+5:30

घरपोच गॅस सिलिंडर पोहोचविणाऱ्या तीन चाकी मालवाहूने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. किशोर बिजाराम देवतळे रा. खांबाडा जि. चंद्रपूर असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Three wheelchair bikes hit the bike | तीनचाकी मालवाहूची दुचाकीला धडक

तीनचाकी मालवाहूची दुचाकीला धडक

Next
ठळक मुद्देएक ठार : राष्ट्रीय महामार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : घरपोच गॅस सिलिंडर पोहोचविणाऱ्या तीन चाकी मालवाहूने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. किशोर बिजाराम देवतळे रा. खांबाडा जि. चंद्रपूर असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
किशोर देवतळे हा हिंगणघाट येथील येनोरा मार्गावरील बजाज दालमीलमध्ये सुपरवायझर म्हणून काम करीत होते. काल सुट्टी असल्याने ते सासरवाडी असलेल्या हळदगाव येथे गेले होते. तेथून आज ते एम.एच. ३१ ए.व्ही. ५८५४ क्रमांकाच्या दुचाकीने परतीचा प्रवास करीत असताना हा अपघात झाला. सदर दुचाकी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात आली असता विरुद्ध दिशेने गॅस सिलिंडर घेऊन येणाºया एम.एच. ३२ क्यू. ५७७८ क्रमांकाच्या मालवाहूने दुचाकीला धडक दिली. यात किशोर देवतळे याचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या घटेनची हिंगणघाट पोलिसांनी नोंद घेतली असून मृतक किशोरच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

आरोपी मालवाहू चालक पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणातील आरोपी मालवाहू चालक किशोर आंनद धोटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर मागील चार दिवसात तीन अपघात झाले असून यात दोघांचा प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे भरधाव वाहनांच्या गतीला आवर घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासह वाहतूक पोलिसांची तेथे नियुक्ती करणे गरजेचे आहे.

दुचाकी अपघातात दोन ठार
कारजा (घा.) - बांगडापूरच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीला अपघात झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास झाला. रामभाऊ मारोती धाडसे (५०) व विवेक लक्ष्मण करनाके (४०), असे मृतकांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, एम.एच. ३२ एफ. ७२३१ क्रमांकाच्या दुचाकीने विवेक आणि रामभाऊ हे दोघे सावरगाव येथून बांगडापूरच्या दिशेने जात होते. दुचाकी धर्ती शिवारातील पुलाजवळ आली असता वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दरम्यान वाहन पुलाच्या सुरक्षा कठड्यांवर जावून धडकले. या अपघातात रामभाऊ याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या विवेकला परिसरातील नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद कारंजा पोलिसांनी घेतली आहे.

Web Title: Three wheelchair bikes hit the bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात