रस्त्यावर तूर फेकून सीएमचा निषेध

By admin | Published: May 6, 2017 12:33 AM2017-05-06T00:33:52+5:302017-05-06T00:33:52+5:30

तुरीचा अखेरचा दाणा खरेदी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होेते. वास्तविकतेत शासकीय तूर खरेदी बंद झाल्याने तूर उत्पादकांवर संकट ओढवले आहे.

Throwing tur on the road and CM's protest | रस्त्यावर तूर फेकून सीएमचा निषेध

रस्त्यावर तूर फेकून सीएमचा निषेध

Next

शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रोहण्यात स्थानबद्ध
आर्वी : तुरीचा अखेरचा दाणा खरेदी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होेते. वास्तविकतेत शासकीय तूर खरेदी बंद झाल्याने तूर उत्पादकांवर संकट ओढवले आहे. अनेक शेतकऱ्यांची तूर घरीच आहे. त्यांच्या या वक्तव्याचा आणि शासकीय धोरणाचा निषेध नोंदविण्याकरिता शुक्रवारी संतप्त तूर उत्पादकांनी मुख्यमंत्र्यांचा काफीला आर्वीत दाखल होताच तूर फेकून निषेध नोंदविला. पोलिसांनी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आर्वीत स्थानबद्ध केले.
आर्वीत मुख्यमंत्री दाखल होताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौक ते बसस्थानक परिसरातील या मुख्य रस्त्यावर तूर फेकून शासनाच्या तूर खरेदी योजनेचा निषेध नोंदविला. आर्वीतील नाफेडने खरेदी केलेल्या तुरीत व्यापाऱ्याची तूर अधिक आहे. व्यापाऱ्याच्या तुरीचा काटा आधी करून शेतकऱ्यांचा माल अद्यापही काटा न झाल्याने शेतकऱ्यांच्या तूर खरेदीबाबत शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे शेतकरी म्हणाले. आर्वीच्या रस्त्यावर शेतकरी संघटना व प्रहार सोशल फोरमच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर तूर फेकून शासनाच्या तूर खरेदीचा निषेध नोंदविला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून सायंकाळी सुटका केली तर प्रहारचे अध्यक्ष बाळा जगताप यांनी आर्वीत मुख्यमंत्री येण्यापूर्वीच ताब्यात घेऊन सायंकाळी सोडण्यात आले.
रोहण्यात तुरीच्या मुद्यावरून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार होते. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांना रोहणा येथे स्थानबद्ध करण्यात आले. यात जि.प. सदस्य ज्योती निकम, माजी जि.प. सदस्य गजानन निकम, उपसरपंच मंगेश मानकर, महेंद्र मानकर यांच्यासह शेतकऱ्यांचा समावेश होता.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Throwing tur on the road and CM's protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.