देवळी शिवारात व्याघ्र दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:39 PM2018-10-11T22:39:54+5:302018-10-11T22:40:21+5:30

तालुक्यातील आंबोडा व कोळोणा (चोरे) या ठिकाणी दोन जनावरांचा बळी घेवून दहशत पसरविणारा वाघ देवळीत दाखल झाला. देवळीपासून तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या एकपाळा शिवारातही या वाघाने गुरुवारच्या पहाटे बैलाचा फडशा पाडला. त्यानंतर हा वाघ याच शिवारात ऐटीत बसून असलेला पाहिल्याने परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे. पण, वनविभाग या वाघापासून लांबच असल्याने त्यांच्या कार्यपध्दतीबाबत रोष व्यक्त होत आहे.

Tiger View in Deoli Shiva | देवळी शिवारात व्याघ्र दर्शन

देवळी शिवारात व्याघ्र दर्शन

Next
ठळक मुद्देएकपाळा परिसरात बैलाचा पाडला फडशा : दोन दिवसात तिसरा बळी

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : तालुक्यातील आंबोडा व कोळोणा (चोरे) या ठिकाणी दोन जनावरांचा बळी घेवून दहशत पसरविणारा वाघ देवळीत दाखल झाला. देवळीपासून तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या एकपाळा शिवारातही या वाघाने गुरुवारच्या पहाटे बैलाचा फडशा पाडला. त्यानंतर हा वाघ याच शिवारात ऐटीत बसून असलेला पाहिल्याने परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे. पण, वनविभाग या वाघापासून लांबच असल्याने त्यांच्या कार्यपध्दतीबाबत रोष व्यक्त होत आहे.
एकपाळा शिवारातील सुधाकर मारोतराव उगेमुगे यांच्या शेतातील गोठ्यासमोर बोरीच्या झाडाला बैल बांधून होता. गुरुवारी पहाटेच्या सुमारास या बैलावर झडप घेऊन वाघाने त्याच्या नरडीचा घोट घेतला. साडेचार वर्षाच्या या बैलाला वाघाने ७९ फुटापर्यंत दुसऱ्या शेतात ओढत नेत त्याच्या मानेचे लचके तोडले. उगेमुगे सकाळी ६ वाजता शेतात गेल्यावर त्यांना बैलाची शिकार केल्याचे लक्षात आले. या शिकारीचा आजुबाजूला वाघाच्या पाऊल खुणा दिसून आल्या. याबाबतची त्यांनी लगेच वनविभागाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सकाळी ९ वाजता दरम्यान वनविभागाचे कर्मचारी व पत्रकारही वृत्त संकलनासाठी घटनासथळी दाखल झाले. यावेळी लोकमतचे प्रतिनिधी हरिदास ढोक वृत्त संकलन करीत असतांना त्यांची नजर शिकारीपासून शंभर फुट अंतरावर ऐटीत बसून असलेल्या वाघावर पडली. त्यांनी ही बाब लगेच वनरक्षक व इतर पत्रकारांच्या लक्षात आणून दिली. पाच वर्ष वयोगटातील अतिशय भारदस्त पट्टेदार वाघाचे दर्शन ‘याची देही याची डोळा’ घडल्याने सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. घामाघूम झालेल्यांनी वनविभागाच्यावतीने वाघाला हुसकावून लावण्याकरिता बारुद फोडून आवाज केला. तसेच ध्वनिक्षेपणावरून आजूबाजूच्या शेतकºयांनाही सतर्क करण्यात आले. लगतच्या शेतातच सोयाबीनची मळणी सुरु असल्याने उपस्थितांनी सोयाबीनच्या गंजीवर चढण्यास सांगितले. त्यामुळे सर्वांनीच त्या गंजीवर चढून आपल्याला सुरक्षीत करुन घेतले. असे असले तरीही वाघाने चांगलीच दहशत पसरली आहे.
एकपाळा शिवारातच वाघाचा मुक्काम
हा वाघ सध्या एकपाळा हनुमान मंदिरालगतच्या नाल्यात झुडूपांमध्ये दबा धरून असल्याचे संकेत मिळत आहे. या भागातील वानरांनी झाडावर एकच गोंधळ केल्यामुळे याबाबीला पुष्टी मिळत आहे. शेतकरी, शेतमजुर व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी हा परिसर अतिशय वर्दळीचा आहे. त्यामुळे वनविभागाकडून या कामात होत असलेली दिरंगाई अक्षम्य ठरत आहे. या वाघाच्या गळ्यात ट्रॅकींग कॉलर नसल्याने हा वाघ वनविभागाच्या गिनतीत नसल्याचे सांगितले जात आहे.
...तर तुम्ही येऊन काम करा!
एकपाळा शिवारात सकाळी वाघ दिसून आल्यानंतर वार्तांकनासाठी आलेल्यांनी ही बाब वन परिक्षेत्र अधिकारी बनसोड यांच्या लक्षात आणून दिली. याठिकाणी वनविभागाचे फक्त पाच वनरक्षक कार्यरत असून त्याच्याकडे कोणतीही व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आले.परिसरातील शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण असल्याने याठिकाणी वाघाचे पुढील लोकेशन घेण्यासाठी ड्रोन कॅमेºयाची व गुंगीचे औषध देण्यासाठी शुटरची व्यवस्था करण्याबाबत सुचविण्यात आले. परंतु आमच्या पेक्षा तुम्हाला जास्त समजते का, ऐवढेच आहे तर तुम्ही येवून काम करा, असे उर्मट उत्तर बनसोड यांनी भ्रमणध्वनीवरुन दिल्याने रोष व्यक्त होत आहे.

Web Title: Tiger View in Deoli Shiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.