वर्धा जिल्ह्यात पुन्हा वाघाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:43 AM2019-02-28T11:43:22+5:302019-02-28T11:44:07+5:30
हिंगणी वनपरिक्षेत्राच्या झङशी सहवन क्षेत्रातील तामसवाडा शिवारात शेतात बांधून असलेल्या कालवडीवर वाघाने हल्ला करून ठार केले. सदरची घटना बुधवारी रात्रीच्या दरम्यान घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: हिंगणी वनपरिक्षेत्राच्या झङशी सहवन क्षेत्रातील तामसवाडा शिवारात शेतात बांधून असलेल्या कालवडीवर वाघाने हल्ला करून ठार केले. सदरची घटना बुधवारी रात्रीच्या दरम्यान घडली. यापुर्वी त्याच भागात दोन घटनात दोन गुरे वाघाने फस्त केली होती.
आकोली येथील सुनील गुणवंत सोनूले यांचे तामसवाडा शिवारातील पटात शेत आहे. रात्रीला शेतात गुरे बांधलेली होती. रात्रीच्या दरम्यान वाघाने कालवडीवर झङप घालून तिला जागीच ठार केले. सकाळी सुनील हा शेतात गेला असता शिकारीची घटना उघडकीस आली.
वाघाने कालवडीची शिकार केल्याची माहिती मिळताच क्षेत्र सहाय्यक के. एस. वाटकर, वनरक्षक एम. डी. पीसे, वनमजूर वाटकर यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला तर ङॉ. डी. एस. धनविज यांनी शवविच्छेदन केले. शिकारीच्या घटनेने नागरिकांत भितीचे वातावरण आहे.