नवीन तालुका निर्मितीच्या वेळी प्रथम सिंदीला प्राधान्य देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 10:27 PM2019-07-20T22:27:07+5:302019-07-20T22:27:34+5:30
कुठलेही राजकीय वलय नसताना स्वकर्तृत्वावर आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे देशाच्या सर्वोच्च सभागृहात पोहोचलो. सिंदी क वर्ग असूनही या गावाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नसल्यामुळे सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सिंदीला तालुक्याचा दर्जा प्राप्त करून देऊ तसेच तालुका निर्मितीच्या वेळेस सिंदीला प्रथम प्राधान्य देऊ, अशी ग्वाही खासदार रामदास तडस यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : कुठलेही राजकीय वलय नसताना स्वकर्तृत्वावर आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे देशाच्या सर्वोच्च सभागृहात पोहोचलो. सिंदी क वर्ग असूनही या गावाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नसल्यामुळे सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सिंदीला तालुक्याचा दर्जा प्राप्त करून देऊ तसेच तालुका निर्मितीच्या वेळेस सिंदीला प्रथम प्राधान्य देऊ, अशी ग्वाही खासदार रामदास तडस यांनी दिली.
स्थानिक नगरपालिकेच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार समीर कुणावार होते. नगराध्यक्ष संगीता शेंडे, उपाध्यक्ष वंदना डकरे, बांधकाम सभापती बबिता तुमाने, शिक्षण सभापती आशीष देवतळे, सभापती वनिता मदनकर, मुख्याधिकारी रवींद्र ढाके व नगरसेवक उपस्थित होते. सहा महिन्यांपासून बंद झालेल्या गाड्यांचा थांबा पूर्ववत सुरू करून दिल्याने विद्यार्थी प्रवासी मित्र मंडळातर्फे अंकिता बारई, अनुजा चरडे, पायल चहंकार, प्रणाली मदनकर, हृतिक डकरे यांनी खासदार तडस यांचे आभार व्यक्त करून सत्कार केला. आमदार समीर कुणावार म्हणाले, सिंदी शहराचा विकास करण्यासाठी शासनाने १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
या निधीतून अनेक विकासात्मक कामे केली जात असून अनेक कामे अद्याप करायची आहेत. शासनाकडून सिंदीचा कायापालट करण्यासाठी पुन्हा निधी मिळणार आहे. ड्रायपोर्टमध्ये स्थानिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याकरिता शासनस्तरावर प्रयत्न केले जाईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष संगीता शेंडे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर वृक्षारोपण व विविध कामांचे भूमिपूजन आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला भाजप गटनेत्या अजया साखळे, नगरसेवक अमोल बोंगाडे, वनिता सेलूकर, पुष्पा सिरसे, सुमन पाटील, प्रकाशचंद्र डफ, विलास तळवेकर, रमेश उईके, प्रकाश मेंढे, जयना बोगाडे, चंदा बोरकर, ओमप्रकाश राठी, सुधाकर घवघवें, आदी हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी रवींद्र ढाके तर संचालन व आभार प्रदर्शन भागवत पवार यांनी केले.