महिलांनी जागृत रहावे ही काळाची गरज
By admin | Published: August 14, 2016 12:31 AM2016-08-14T00:31:30+5:302016-08-14T00:31:30+5:30
महिलांनी स्वत: जागृत रहावे ही काळाची गरज झाली आहे. विकासात्मक भूमिका ठेवत कुठल्याही क्षेत्रात वर्चस्व निर्माण करणे हेच ध्येय ठेवायला हवे.
वंदना पळसापूरे : स्तनपान फायदे व महत्त्व तसेच गैरसमज यावर मार्गदर्शन
वर्धा : महिलांनी स्वत: जागृत रहावे ही काळाची गरज झाली आहे. विकासात्मक भूमिका ठेवत कुठल्याही क्षेत्रात वर्चस्व निर्माण करणे हेच ध्येय ठेवायला हवे. असे मत डॉ. वंदना पळसापूरे यांनी मांडले.
न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज येथील गृहअर्थशास्त्र विभागातर्फे महिलांसाठी ‘स्तनपान फायदे व महत्त्व व त्यामधील गैरसमज’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होत्या.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील स्त्रिरोग तज्ज्ञ डॉ. लिना बीरे तसेच प्राचार्य डॉ. प्रशांत कडवे, डॉ. वंदना पळसापूर आणि गृहअर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. कांचन इंगोले उपस्थित होत्या.
स्तनपान कसे आवश्यक व त्याचे फायदे, भावी पिढी त्यावर कशी अवलंबून आहे. यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्त्रियांच्या मनात असलेले गैरसमज दूर केले. डॉ. बीरे यांनी विषयाशी निगडीत सर्व मुलींच्या समस्या, त्यांचे भावी आयुष्य, महिलांचा विकास या विषयावर सुद्धा योग्य मार्गदर्शन केले.
स्त्रियांनी सक्षम होणे ही खरी काळाची गरज, असे मत त्यांनी आपल्या मार्गदर्शनात मांडले. गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कांचन इंगोले यांनी महिलांनी सौंदर्य राखून स्वत:ची रक्षाकरणे शिकायला हवे. तसेच समाजात स्त्री शक्तीला वाढविण्याचे कार्य सतत चालू ठेवणे गरजेचे आहे, असे मत मांडले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. स्रेहल गूजरकर यांनी केले, तर आभार प्रा. चेतना बोबडे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. काळे, प्रा. उघडे, प्रा. लांबट, प्रा. उल्हे, प्रा. वरटकर व विद्यार्थी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
शालोम नर्सिंग स्कूल
वर्धा शालोम नर्सिंग स्कूल समता नगर येथे येथे स्तनपानाचे महत्त्व, स्तनपानाची सुरुवात, वेळ व बाळाला, आईला होणारे फायदे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सात दिवस निरनिराळ्या प्रकारे कार्यक्रम राबविण्यात आले. यावेळी बहादुरे, दामले, पाटील, तराळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी स्तनपान विषयावर चर्चा, पोस्टर कलेक्शन, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, बक्षीस व निरोप समारंभ पार पडले. तसेच उपस्थितांचे आभार अंकिता गाडगे यांनी मानले.