टिप्पर-ट्रेलरची समोरासमोर धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 11:54 PM2018-09-25T23:54:12+5:302018-09-25T23:54:44+5:30

वर्धा-नागपूर मार्गावर कान्हापुर गोंदापुर नजिकच्या वळणावर ट्रेलर व टिप्परची समोरासमोर धडक झाली. यात ट्रेलरचा चालक रोहिदास रामभाऊ मारक (२५) रा. सातेगाव ता. शेगाव याचा जागीच मृत्यू झाला. तर टिप्परचा चालक विजय श्रीलालमन रज्जाक हा गंभीर जखमी झाला.

Tipper-Trailer faces face to face; One killed | टिप्पर-ट्रेलरची समोरासमोर धडक; एक ठार

टिप्पर-ट्रेलरची समोरासमोर धडक; एक ठार

googlenewsNext
ठळक मुद्देएक गंभीर : वर्धा-नागपूर मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू/आकोली : वर्धा-नागपूर मार्गावर कान्हापुर गोंदापुर नजिकच्या वळणावर ट्रेलर व टिप्परची समोरासमोर धडक झाली. यात ट्रेलरचा चालक रोहिदास रामभाऊ मारक (२५) रा. सातेगाव ता. शेगाव याचा जागीच मृत्यू झाला. तर टिप्परचा चालक विजय श्रीलालमन रज्जाक हा गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीला गॅसकटरने दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले. हा अपघात दुपारी १२ च्या सुमारास झाला. दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरच राहिल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता खोळंबली होती.
मृतक हा त्याच्या ताब्यातील एम.एच.४६ बी.बी. ४४३३ क्रमांकाचे जडवाहन घेवून वर्धेकङून नागपूरच्या दिशेने जात होता. तर गंभीर जखमी हा त्याच्या ताब्यातील एम.पी. ३९ एच. १३७४ क्रमांकाचे जड वाहन घेवून नागपूरकडे जात होता. दोन्ही वाहने कान्हापूर नजीकच्या वळण रस्त्या परिसरात आले असता दोन्ही वाहनांमध्ये समारासमोर धडक झाली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळता सेलू पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सौरभ घरडे, वामन घोडे, जमादार किशोर कापडे व मनिष कांबळे यांची आपल्या चमुसह घटनास्थळ गाठून दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेवून जखमीला रुग्णालयाकडे रवाना करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.
ट्रेलरने चिमुकलीला चिरडले
केळझर - भरधाव ट्रेलरने पाच वर्षीच चिमुकलीला चिरडले. हा अपघात सोमवारी नजीकच्या आमगाव (खडकी) शिवारात झाला. दुर्गा अंकुश पंधराव, असे मृतक मुलीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पाच वर्षीय दुर्गा ही तिच्या आजीसोबत घराकडे जात होती. ते दोघेही वर्धा-नागपूर हा महामार्ग ओलांडत असताना भरधाव असलेल्या ट्रेलरने दुर्गाला धडक दिली. यात दुर्गाच्या अंगावरून या जडवाहनाचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रेलर चालक पलविंदरसिंग निर्मलजीत सिंग (३५) रा. रायपूर (छत्तीसगढ) याच्याविरुद्ध सिंदी पोलिसात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सिंदी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी जावेद धमिया करीत आहेत.

Web Title: Tipper-Trailer faces face to face; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.