टमाटर आणि पत्ताकोबी १२० रुपये किलो
By admin | Published: July 17, 2017 02:04 AM2017-07-17T02:04:39+5:302017-07-17T02:04:39+5:30
तालुक्यात झालेल्या अल्पशा पावसामुळे भाजीपाला उत्पादन घटले असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहे.
किमती दीडपट : नागरिक हैरान
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तालुक्यात झालेल्या अल्पशा पावसामुळे भाजीपाला उत्पादन घटले असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहे. भाजीपाल्याचे भाव वाढल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ पोहचत आहे. ३ ते ४ वर्षांपासून वर्धा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे दोन्ही हंगामातील पीक उत्पादन घटले होते. शेतात उपलब्ध असलेल्या पाण्यावर शेतकरी व भाजीपाला उत्पादकांनी भाजीपाला घेतला होता. परंतु गत १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पाणी पातळीत घट होण्यास सुरुवात झाली आहे.
गावांत भरणाऱ्या आठवडी बाजारात भाजीपाल्याचे भाव एकदम वधारल्याचे दिसून आले. या बाजारात टमाटर आणि कोबी १२० रुपये किलो दराने विकल्या जात आहे. भाजीपाल्याचे भाव एकदमच वाढलेले पाहून बहुतांश नागरिकांनी बाजाराकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. वायगाव येथे दर गुरुवारी मोठा बाजार भरतो या बाजारात खेड्यासह विदर्भातील व्यापारी सुद्धा येतात. पावसाला प्रारंभ झाल्याने भाजीपाल्याचे दर कमी होतील असे नागरिकांचे मत आहे.
मिरची ५०, वांगे ४० रुपये, फुलकोबी १००, अद्रक ७०, कोथींबीर १३०, पालक ५०, मेथी ४०, कारले ६०, दोडके ५०, गवार ४०, भेंडी ६० रुपये प्रती किलो दराने विक्री होताना दिसत आहे.