दारू तस्करांवर तब्बल १४ चौक्यांचा वॉच
By admin | Published: March 12, 2017 12:32 AM2017-03-12T00:32:33+5:302017-03-12T00:32:33+5:30
जिल्ह्यात दारूबंदी असली तरी सिमेवर असलेल्या चंद्रपूर वगळता इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारूसाठ्याची आयात होतो.
गृहरक्षकांचीही मदत : दारूमुक्त होळीकरिता पोलीस प्रशासन सज्ज
वर्धा : जिल्ह्यात दारूबंदी असली तरी सिमेवर असलेल्या चंद्रपूर वगळता इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारूसाठ्याची आयात होतो. होळीच्या पर्वावर जिल्ह्यात दारूची आवक वाढण्याची शक्यता आहे. यावर आळा घालण्याकरिता जिल्ह्याच्या सिमेवरच त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांचा असल्याची माहिती आहे. याकरिता जिल्ह्याच्या सिमेवर तब्बल १४ चौक्या तैनात करण्यात आहेत.
शुक्रवारपासून कार्यरत झालेल्या या चौक्यात या चौक्यांकडून येथे संशयीतांची तपासणी करण्यात येत आहे. काल एकाच रात्री तब्बल ६० कारवाई केली असून ६५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यासह ग्रामीण भागात असलेल्या गावठी दारूअड्ड्यांवर वॉश आऊट मोहिमेद्वारे अंकूश लावण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे. यासह वाहतूक पोलिसांकडून ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई सुूर आहे. दारू पिऊन शहरात धिंगाणा घालणऱ्यांवची या होळीत खैर नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)