पर्यटन हे रोजगार व महसूल देणारे क्षेत्र आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:20 AM2018-10-14T00:20:03+5:302018-10-14T00:21:00+5:30

जगात केवळ पर्यटनावर अर्थव्यवस्था असणारी अनेक शहरे आहेत. पर्यटन क्षेत्र हे रोजगार आणि महसूल देणारे क्षेत्र असून या क्षेत्राचा जास्तीत जास्त विस्तार करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे.

Tourism is an area of ​​employment and revenue | पर्यटन हे रोजगार व महसूल देणारे क्षेत्र आहे

पर्यटन हे रोजगार व महसूल देणारे क्षेत्र आहे

googlenewsNext
ठळक मुद्देमदन येरावार : तीन कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नाचणगाव : जगात केवळ पर्यटनावर अर्थव्यवस्था असणारी अनेक शहरे आहेत. पर्यटन क्षेत्र हे रोजगार आणि महसूल देणारे क्षेत्र असून या क्षेत्राचा जास्तीत जास्त विस्तार करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे. या पर्यटनाच्या माध्यमातून नाचणगावमधील प्रत्येकाच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिल्यास त्याचा जास्त  आनंद होईल,  असे प्रतिपादन पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी केले.
राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून नाचणगाव येथील भोसलेकालीन सराई किल्याचे विकास काम आणि इसाई माता मंदिर सभागृह बांधकाम अशा तीन कोटी रुपयांच्या कामांचा श्रीगणेशा ना. येरावार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी आ. रामदास आंबटकर, पं.स.चे उपसभापती किशोर गव्हाळकर, नाचणगावच्या  सरपंच सविता गावंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने आदींची उपस्थिती होती.
अनेकांची कुलदेवता असलेल्या इसाई मातेचे वास्तव्य असलेले गाव दुर्लक्षित राहूच शकत नाही. सदर पर्यटनस्थळी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण आग्रही आहे. या शासनाने पर्यटना क्षेत्राच्या विकासावर भर दिला आहे. तसेच शेती, कौशल्यविकास व मुद्रा योजनेच्या माध्यमातून युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. देवळीच्या एन.टी.पी.सी.प्रोजेक्टमुळे या भागात उद्योग येण्यास तयार आहे. त्यामुळे पर्यटनाच्या साथीला उद्योगांची भर पडल्यास या भागाचा विकास झपाट्यानेच होईल असे यावेळी ना. येरावार यांनी स्पष्ट केले. इसाई माता मंदिराचे काम सहा महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी आ. रामदास आंबटकर व राजेश बकाने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पं.स. उपसभापती किशोर गव्हाळकर यांनी केले तर आभार विनोद मावळे यांनी मानले.
नाचणगाव दुर्लक्षित राहणार नाही
महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत नाचणगाव येथील भोसले काहीन सरई व इसामाना देवस्थान येथील दोन कोटी आठ लाखाच्या विकास कामाचे भूमीपूजन पर्यटन व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. नाचणगाव हे कुठल्याही परिस्थितीत विकासापासून दुर्लक्षित राहणार नाही, अशी ग्वाही ना. येरावार यांनी दिली. कार्यक्रमाला जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, वैशाली येरावार, नागरी बँकचे अध्यक्ष केशव दांडेकर, पं.स. उपसभापती किशोर गव्हाळकर, राहुल चोपडे, संजय गाते, किशोर गव्हाळकर, रमेश निंबाळकर, सचिन कासार, विनोद माहुरे, संतोष तिवारी, प्रल्हाद कैकाडी, ओंकार राऊत, सुरेश हनुमंते व ग्रा.पं. सदस्य आदींची उपस्थिती होती.

Web Title: Tourism is an area of ​​employment and revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन