‘कॅटरिना’ची ऐट खुणावतेय पर्यटकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 11:41 PM2019-02-16T23:41:20+5:302019-02-16T23:42:24+5:30

येथील बोर व्याघ्र प्रकलातील जंगल सफारीदरम्यान बच्चेकंपनी तेथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटत असून अनेक पर्यटकांकडून सध्या गाईडकडे ‘बोरची राणी’ अशी ओळख असलेल्या कॅटरिना नामक वाघिणीची एक झलक दाखविण्याची मागणी होते.

Tourists are katanaatatai katrina | ‘कॅटरिना’ची ऐट खुणावतेय पर्यटकांना

‘कॅटरिना’ची ऐट खुणावतेय पर्यटकांना

Next
ठळक मुद्देएक झलक दाखविण्याची होते मागणी । बोर व्याघ्र प्रकल्पात मिळतोय ‘आनंद’

रितेश वालदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरधरण : येथील बोर व्याघ्र प्रकलातील जंगल सफारीदरम्यान बच्चेकंपनी तेथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटत असून अनेक पर्यटकांकडून सध्या गाईडकडे ‘बोरची राणी’ अशी ओळख असलेल्या कॅटरिना नामक वाघिणीची एक झलक दाखविण्याची मागणी होते. वास्तविक पाहता जंगलातील काही नैसर्गिक पाणवठे आटल्याने सध्या या ऐटबाज कॅटरिनाचे दर्शन पर्यटकांना होत आहे. त्यामुळे बोर व्याघ्रप्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी येणाºया पर्यटकांसह बच्चेकंपनीला आनंदच मिळत आहे.
कॅटरिनाच्या दररोज होणाºया साईडिंगने पर्यटकांमध्ये आणि वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साह निर्माण होत आहे. या ठिकाणी येणारे पर्यटक आज मला कॅटरिनाचे दर्शन होईलच असे सहज बोलताना दिसतात. रुपेरी परद्यावर जशी अभिनेत्री कॅटरिना कैफ ही तिच्या रसिकांना एका अनोख्या अदेत भारावून टाकते तशीच बोरची राणी असलेली कॅटरीना नामक वाघिण सध्या आपल्या साईडिंगने पर्यटकांना मंत्रमुग्धच करीत असल्याचे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. देशातील सर्वात छोटा व्याघ्रप्रकल्प म्हणून ओळख असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पात अंबिका आणि कॅटरिना या दोन वाघिण आहेत. तर वन विभागाने त्यांच्या कागदांवर वाघिण अंबिकाची बीटीआर टी-१ तर कॅटरीना या वाघिणीची बीटीआर टी-३ अशी नोंद घेतली आहे. या दोन्ही वाघिणींचे सध्या पर्यटकांना सहज दर्शन होत असून दिवसेंदिवस बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

कॅटरिनाची माय अंबिका
कॅटरिना नामक वाघिणीचा जन्म बोर मध्येच झाला असून सध्या ती सुमारे सात वर्षांची असल्याचे सांगण्यात येते. कॅटरिनाने आतार्यंत चारवेळा छाव्यांना जन्म दिला असून तिच्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पाला १३ व्याघ्र संततीची प्राप्ती झाली आहे. बोर येथील अनेकांना भुरळ घालणारी कॅटरिनाची आईही तेथीलच सुमारे नऊ वर्षे असलेली अंबिका वाघिण असल्याचेही सांगण्यात येते.

झुडपातून बघते तेव्हा पसरते शांतता
सध्या बोर व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांना कॅटरीना नामक वाघिणीचे दर्शन होत आहे. जंगल सफारीदरम्यान पर्यटकांची जीप पुढे गेल्यावर हळूच कॅटरीना ही झुडपातून बाहेर निघत पर्यटकांच्या जीपकडे बघते. याप्रसंगी स्मशानशांतता पसरत असून तिच्या या अंदाजामुळे येथे येणाºया पर्यटकांसह वन्यजीवप्रेमी सध्या मंत्रमुग्धच होत आहेत.

Web Title: Tourists are katanaatatai katrina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.