नैसर्गिक पाणवठ्यात विष कालवून शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 11:52 PM2018-03-01T23:52:09+5:302018-03-01T23:52:09+5:30

माळेगाव (ठेका) बिटात नैसर्गिक पाणवठ्यातील पाणी पिल्याने सात बोकडांचा मृत्यू झाला. यामुळे प्रस्तुत प्रतिनिधीने फेरफटका मारला असता धक्कादायक वास्तव पुढे आले.

Toxic poaching in natural seashore | नैसर्गिक पाणवठ्यात विष कालवून शिकार

नैसर्गिक पाणवठ्यात विष कालवून शिकार

Next
ठळक मुद्देजंगलात प्राण्यांच्या अवयवांचा सडा : सात बोकडांच्या मृत्यूने उघड

ऑनलाईन लोकमत
आकोली : माळेगाव (ठेका) बिटात नैसर्गिक पाणवठ्यातील पाणी पिल्याने सात बोकडांचा मृत्यू झाला. यामुळे प्रस्तुत प्रतिनिधीने फेरफटका मारला असता धक्कादायक वास्तव पुढे आले. पाणवठ्यांच्या आसपास मोरांचे पाय विखुरलेले दिसून आले. शिवाय हरिणांच्या पायासारखे पायही दिसून आले. यावरून येथे नेहमी शिकार होत असल्याचे सिद्ध होते.
सदर नैसर्गिक पाणवठे बोर व्याघ्र प्रकल्पापासून १०० मिटरवर आहेत. पाणवठ्यावर वन्यप्राणी तृष्णातृप्तीस येतात. ही बाब हेरून शिकारी पाण्यात विष कालवून शेजारी लपून बसतात. मोर, हरिण, ससा हे प्राणी पाणी पिले की गेलेच त्यांना गुंगी येते. मग, शिकारी अलगद पकडून मानेवर सुरी फिरवितात. हा प्रकार वनविभागापासून लपून नाही. वनरक्षकांपासून तर क्षेत्र सहायकापर्यंत सर्वांना माहिती आहे; पण कुणीही कारवाई करीत नाही. ‘लोकमत’ने नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यात विष कालवून कशी शिकार केली जाते. गळाला हिरवी मिरची बांधून गळ पाणवठ्यावर ठेवून होणाºया शिकारीकडे वनविभागाचे लक्ष वेधले.
वनक्षेत्रात विजय भाऊराव लेंडे यांचे सात बोकड पाणवठ्यातील विषक्त पाणी पिल्याने मृत झाले; पण वनविभागाने साधी विचारणाही केली नाही. हा पाणवठा व्याघ्र प्रकल्पापासून जवळ असल्याने वाघ, बिकट यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. संवेदनशील बिटात वनरक्षक, क्षेत्र सहायक मुख्यालयी राहत नाही. यामुळे शिकारी असो वा सागवान तस्कर यांना मोकळे रान मिळाले आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

पाणवठ्यात विष कालवून शिकार करणाऱ्यांची माहिती तथा लोकेशन प्राप्त झाले आहे; पण त्यांना रंगेहात पकडायचे आहे. यामुळे अद्याप कारवाई केलेली नाही. लवकरच त्यांना जेरबंद करण्यात येणार आहे.
- पी.एम. वाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, हिंगणी.

Web Title: Toxic poaching in natural seashore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.