ट्रॅक्टर मालकाने पोलीस शिपायाला दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 11:52 PM2018-09-15T23:52:22+5:302018-09-15T23:53:06+5:30

विनापरवाना गाडी चालवत असलेल्या ट्रॅक्टरच्या चालकाला पोलिसांनी अडवून त्याला चालान देण्यात आली. यावेळी सदर ट्रॅक्टर चालकाने पोलिसांकडून चालान घेत घटनेची माहिती मालकाला दिली.

The tractor owner has given a tip to the police officer | ट्रॅक्टर मालकाने पोलीस शिपायाला दिला चोप

ट्रॅक्टर मालकाने पोलीस शिपायाला दिला चोप

googlenewsNext
ठळक मुद्देचालान फाडल्याच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : विनापरवाना गाडी चालवत असलेल्या ट्रॅक्टरच्या चालकाला पोलिसांनी अडवून त्याला चालान देण्यात आली. यावेळी सदर ट्रॅक्टर चालकाने पोलिसांकडून चालान घेत घटनेची माहिती मालकाला दिली. त्यानंतर मालकाने घटनास्थळी येत पोलीस शिपायाशी वाद घालत त्याला चक्क मारहाण केली. शिवाय शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी तक्रारीवरून देवळी पोलीस ठाण्यात आरोपी ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालान का फाडली असे म्हणत ट्रॅक्टर मालकाने सुरूवातीला पोलीस शिपाई विलास गमे याच्याशी वाद केला. याच वेळी विलास गमे याला ट्रॅक्टर मालकाने लाथा बुक्यांनी मारहाण केली. शनिवारी दुपारी पोलीस शिपाई गमे हे कर्तव्यावर असताना त्यांनी स्थानिक टोल नाक्यावर सुनील ढोक यांचे मालकीचा एमएच ३२ बी १५२२ या क्रमांकाचा ट्रॅक्टर अडविला. कागपत्राची शहानिशा केली असता ट्रॅक्टर चालक धीरज पचारे यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे दिसून आले. यामुळे गमे यांनी चालकावर दंडात्मक कारवाई केली. शिवाय चालान त्याला दिली. त्यानंतर धीरजने त्याची माहिती ट्रॅक्टर मालक ढोक यांना दिली. त्याने घटनास्थळ गाठून पोलीस शिपाई गमे यांना शिविगाळ करून त्यांना लाथा-बुक्यांनी मारहाण केली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पोलीस शिपायाच्या अंगावरील शासकीय गणवेशही फाडत जीवानिशी ठार करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गमे यांच्या तक्रारीवरून आरोपी ट्रॅक्टर मालक सुनील ढोक व ट्रॅक्टर चालक धीरज पचारे याच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९४, ३५३, ३३२, १८६, ५०४, ५०६ ३/१८१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. उल्लेखनिय म्हणजे, या घटनेच्यावेळी संधी साधून ट्रॅक्टर चालक धीरज याने वाहनासह घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. पोलिसांनी सुनील ढोक याला अटक केली असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

Web Title: The tractor owner has given a tip to the police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.