सेवाग्राम आश्रमात पारंपरिक गुढीपाडवा साजरा

By admin | Published: April 10, 2016 02:30 AM2016-04-10T02:30:27+5:302016-04-10T02:30:27+5:30

आश्रम परिसरात पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करण्यात आला. शेतात वखर करून आणि विविध भजनांच्या माध्यमातून हा सण साजरा करण्यात आला.

Traditional Gudi Padva celebrates in Sevagram Ashram | सेवाग्राम आश्रमात पारंपरिक गुढीपाडवा साजरा

सेवाग्राम आश्रमात पारंपरिक गुढीपाडवा साजरा

Next

शेतात वखर करून प्रारंभ : बैलांना सजवून केली विश्वसुखाची प्रार्थना
सेवाग्राम : आश्रम परिसरात पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करण्यात आला. शेतात वखर करून आणि विविध भजनांच्या माध्यमातून हा सण साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मंत्री प्रा.डॉ. श्रीराम जाधव म्हणाले, महाराष्ट्रात सर्वत्र गुढीपाडवा उत्साहात साजरा करतात. मराठी नववर्षाची आणि शेतीच्या सर्व व्यवहाराची सुरुवात या दिवसापासून होते. कृषीसंस्कृती व परंपरा एकमेकांशी जुळल्या आहेत. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, पण आज त्याचीच अवस्था हलाखीची झाली आहे. ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो’ असे पूर्वापार म्हटले जाते. त्यामुळे खरोखरीच बळीराजाचे राज्य येण्याची गरज यावेळी जाधव यांनी व्यक्त केली. जालंधरनाथ यांनीही सर्वांना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.
आश्रमच्या शेतात सजविलेल्या बैलांची विधीवत पूजा केल्यानंतर शेतकरी गवईने वखरनी केली. सिद्धेश्वर उंबरकर, महादेव लोखंडे, निलेश आळणकर, शेरखा पठाण यांनी भजने गायली. यावेळी सा.स.सं.चे मंत्री प्रसाद, भावेष चव्हाण, अशोक गिरी, नामदेव ढोले, बाबा खैरकर, सुशिल फत्तेपुरिया, शोभा तायडे, मालती देशमुख, गिरजा मगर, प्रभा गवई, वैशाली बारई, सुमन नाईक, चंद्रकला पाटील, रूपाली उगले, ममता ठाकरे, जयश्री पाटील, संगिता चव्हाण, माधुरी भोगे, सदामून, कीर्ती कार्डेकर, अंकुश गोडघाटे उपस्थित होते. संचालन विजय धुमाळे यांनी केले.
गर्जना संघटनेद्वारे गुढीपाडवा उत्सव
वर्धा : गर्जन संघटनेतर्फे शितला माता मंदिर परिसरात मराठी नववर्षा निमित्त भव्य गुढी उभारण्यात आली. तसेच शितला माता मंदिरात घट स्थापना करण्यात आली. या नऊ दिवसात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शितला माता मंदिरात १७ एप्रिल रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. गुढी उभारताना संघटनेचे अध्यक्ष महेश ठाकूर, प्रशांत नागतोडे, प्रमोद कोल्हे, दीपक आडेपवार, मंगेश साठे, गुड्डू गावंडे, विनोद सलामे, महेश कडवे, सुरेश तलमले, रवी मुडे, बालु पत्रे, बबलु शाहू, चिंटु माहुले, मिलिंद पाटी, महेश शेंद्रे, सचिन सरमाके, खडसे, रवी जांभुळकर, लल्लू चौबे, मोहन चौधरी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Traditional Gudi Padva celebrates in Sevagram Ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.