उभ्या वाहनांमुळे वाहतुकीचा पचका
By admin | Published: March 15, 2015 02:01 AM2015-03-15T02:01:56+5:302015-03-15T02:02:49+5:30
शहरातील मुख्य चौक तसेच रहदारीच्या रस्त्यालगत वाहने उभी केली जातात. शिवाय आॅॅटोचालक वाहन रस्त्यावरच उभे करीत असल्याने अपघाताच्या घटना घडतात.
वर्धा : शहरातील मुख्य चौक तसेच रहदारीच्या रस्त्यालगत वाहने उभी केली जातात. शिवाय आॅॅटोचालक वाहन रस्त्यावरच उभे करीत असल्याने अपघाताच्या घटना घडतात. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो, शिवाय मुख्य मार्गावर वाहतूक विस्कळीत होते. या प्रकाराला ळा घालण्याची मागणी अखिल भारतीय बापू युवा संगठन यांच्यावतीने वाहतूक नियंत्रण विभाग व संबंधीतांकडे करण्यात आली आहे.
शहरातील बजाज चौक ते वळण मार्गापर्यंत तसेच शास्त्री चौक ते आर्वी नाक्यापर्यंत या मार्गावर सतत वर्दळ असते. याच मार्गावर दवाखाने, बँक कार्यालय, शाळा, मकाविद्यालयांची संख्या अधिक आहेत. त्यामुळे याच मार्गे आॅटो अधिक धावतात. शिवाय रस्त्याच्यालगत वाहनतळाची व्यवस्था नसल्यामुळे वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. त्यामुळे अर्धाअधिक रस्ता हा पार्कींगमध्ये व्याप्त होतो. यामुळे रहदारी करण्याकरिता रस्ता उरत नाही. यात काहीइ युवक वाहन वेगाने चालवित असल्याने अरूंद झालेल्या या मार्गातून आवागमन करणे धोक्याचे ठरते.
दुचाकी वाहन वेगाने चालविणाऱ्या या वाहन धारकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शिवाय आॅॅटोचालक प्रवासी दिसताच रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करतात. कधीतर वेगात असताना ब्रेक मारून आॅटो थांबविला जातो. यामुळे मागाहुन येत असलेल्या चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटुन अपघात होता. या प्रकारात काही गंभीर अपघात झाले आहे. हा प्रकार वादाला कारणीभूत असतो.
चौकाचौकात कुठेही आॅटो उभे केले जाते. याकरिता वाहनतळ निश्चित करून द्यावे. यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार नाही. शिवाय सर्वसामान्यांना सुरक्षित रहदारीकरिता उपाययोजनेची मागणी केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)