सागरच्या अपघाती मृत्यूने शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:10 AM2018-11-28T00:10:20+5:302018-11-28T00:10:39+5:30

बोरगाव (टुमणी) येथील सागर पुरूषोत्तम ढोले (२६) याचा नागपूरवरून बोरगाव (टुमणी)कडे येत असताना ठाणेगाव नजीकच्या बोरीफाटा जवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे बोरगावात शोककळा पसरली असून आज गावात चुली पेटल्या नाही.

The tragic death of the ocean | सागरच्या अपघाती मृत्यूने शोककळा

सागरच्या अपघाती मृत्यूने शोककळा

Next
ठळक मुद्देचुली पेटल्या नाही : मनमिसाळू स्वभावाचा व्यक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद)/ कारंजा (घाडगे): बोरगाव (टुमणी) येथील सागर पुरूषोत्तम ढोले (२६) याचा नागपूरवरून बोरगाव (टुमणी)कडे येत असताना ठाणेगाव नजीकच्या बोरीफाटा जवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे बोरगावात शोककळा पसरली असून आज गावात चुली पेटल्या नाही.
सदर अपघातात सागरच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागला. यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची वार्ता गावात पसरताच सर्वत्र शोककळा पसरली. मंगळवारी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सागर पंचायत समितीमध्ये डाटा एन्ट्री आॅपरेटर म्हणून कार्यरत होता. घरातील सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. नोकरी करताना सर्वांशी आपुलकीचे संबंध त्याने जोपासले होते.
सोमवारी सागर हा नागपूरला काही कामानिमित्त गेला होता. सायंकाळी नागपूरवरून परत येताना कारंजा (घा.) तालुक्यातील बोरीफाटा जवळ उभ्या सी.जी.०४ एच.टी. ९९१२ क्रमांकाच्या ट्रकवर एम.एच. ३२ ए.ए.०३५६ क्रमांकाच्या दुचाकी धडकली. यात गंभीर जखमी झालेल्या सागरचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की सागरच्या डोक्यातील हेल्मेट अचानक बाजूला फेकल्या गेले अन् त्याच्या डोक्याला जबर मार बसला. गंभीर जखमी अवस्थेतील सागरला परिसरातील नागरिकांनी कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषीत केले. सागरच्या पश्चात आई, वडील, बहिण, भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे. तो पं.स.चे माजी सभापती मोहन ढोले यांचा पुतण्या होय. सदर अपघाताची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेत पंचनामा केला. या घटनेची कारंजा पोलिसांनी नोंद घेतली आहे.
 

Web Title: The tragic death of the ocean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू