बांधकामाच्या खड्ड्यात पडून ९ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू; पाथरी गावातील घटनेने खळबळ

By चैतन्य जोशी | Published: September 12, 2022 02:21 PM2022-09-12T14:21:49+5:302022-09-13T10:21:36+5:30

कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल

tragic death of child after falling into construction pit, case registered against the contractor | बांधकामाच्या खड्ड्यात पडून ९ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू; पाथरी गावातील घटनेने खळबळ

बांधकामाच्या खड्ड्यात पडून ९ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू; पाथरी गावातील घटनेने खळबळ

Next

वर्धा  : नवीन अंगणवाडीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी भरुन असल्याने त्या खड्ड्यात पडून नऊ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना ११ रोजी रात्रीच्या सुमारास देवळी तालुक्यातील पाथरी गावात उघडकीस आली. या घटनेने पाथरी गावावर शोककळा पसरली. सार्थक बाळकृष्ण घोडाम (०९) असे मृतक बालकाचे नाव आहे.

मृतक सार्थक घोडाम हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. ११ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्याची गावात शोधाशोध केली. मात्र, तो कुठेही मिळून आला नाही. तेवढ्यातच कुटुंबियांना गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ नवीन इमारत बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ सार्थकचा जोडा आढळून आला. अखेर त्याच खोदलेल्या खड्ड्यात त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.

मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अंगणवाडीसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पाणी भरले आहे. त्याच पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. पोलीस पाटील संजय चरडे यांनी याबाबतची माहिती अल्लीपूर पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी घटनास्थळी धाव घेत रात्री १० वाजताच्या सुमारास सार्थकचा मृतदेह पाण्याने तुडूंब भरलल्या खड्ड्यातून बाहेर काढला. पुढील तपास अल्लीपूर पोलीस करीत आहे.

कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल 

कंत्राटदारास अटक करा, अशी मागणी गावकऱ्यांसह कुटुंबियांकडून जोर धरु लागली. गावकऱ्यांचा रोष पाहता पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी कंत्राटदार आकाश राऊत याच्याविरुद्ध ३०४ (अ) कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली

Web Title: tragic death of child after falling into construction pit, case registered against the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.