प्रशिक्षणार्थी चिकित्सकांनी रूग्णसेवेत झोकून द्यावे!

By admin | Published: January 9, 2017 01:35 AM2017-01-09T01:35:44+5:302017-01-09T01:35:44+5:30

अभ्यासक्रमातून जे ज्ञान ग्रहण केले ते प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी आंतरवासीता हा प्रशिक्षण कालावधी

The trainee doctor should be confined to the patient's patient! | प्रशिक्षणार्थी चिकित्सकांनी रूग्णसेवेत झोकून द्यावे!

प्रशिक्षणार्थी चिकित्सकांनी रूग्णसेवेत झोकून द्यावे!

Next

दिलीप गोडे : आयुर्वेद महाविद्यालयात कार्यशाळा
वर्धा : अभ्यासक्रमातून जे ज्ञान ग्रहण केले ते प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी आंतरवासीता हा प्रशिक्षण कालावधी चिकित्सकांच्या जीवनातील महत्वाचा भाग आहे. या काळात प्रशिक्षणार्थ्यांनी रूग्णसेवेत स्वत:ला पूर्णत: झोकून द्यावे. प्रत्येक रूग्णांकडून आपल्याला नवे काही शिकायला मिळेल, असे मत दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. दिलीप गोडे यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
आयुर्वेद चिकित्साप्रणाली ही अत्यंत पुरातन असून जग तिला स्वीकारू लागले आहे. या शास्त्रावर संशोधन होणे गरजेचे असून संकल्पना नव्याने सुरू करून शेवटच्या माणसाला दिलासा देणारे कार्य करण्याचे आवाहन डॉ. गोडे यांनी यावेळी केले.
कार्यचिकित्सा विभागाद्वारे आयोजित या कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, डॉ. प्रिती देसाई, डॉ. के.एस. आर प्रसाद, विभाग प्रमुख डॉ. वैशाली कुचेवार, संयोजन सचिव डॉ. विनोद आडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागतपर भाषण डॉ. श्याम भुतडा यांनी केले. संचालन डॉ नताशा राठोड यांनी तर आभार डॉ. साधना मिसर यांनी मानले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The trainee doctor should be confined to the patient's patient!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.