डिसेंबरमध्ये जिल्हाकचेरीचे स्थानांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:46 AM2017-11-23T00:46:57+5:302017-11-23T00:47:46+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी २५.४६ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. परिणामी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारत निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Transfer of district collector in December | डिसेंबरमध्ये जिल्हाकचेरीचे स्थानांतरण

डिसेंबरमध्ये जिल्हाकचेरीचे स्थानांतरण

Next
ठळक मुद्देनवीन इमारत तयार होणार : तहसीलच्या इमारतीतून चालणार कामकाज

ऑनलाईन लोकमत 
वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी २५.४६ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. परिणामी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारत निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी इमारत तोडली जाणार असल्याने हे कार्यालय तहसील कार्यालयासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन इमारतीत स्थलांतरीत करण्यात येणार आहे. येथूनच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुमारे १८ विभागाचे कामकाज चालणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाची सध्याची इमारत ही इंग्रज कालीन आहे. ती जीर्ण झाल्यामुळे व पावसाळ्याच्या दिवसात ती अनेक ठिकाणी गळत असल्याने येथील अधिकारी व कर्मचाºयांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. ही जीर्ण इमारत अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त येणाºया नागरिकांच्या दृष्टीने धोक्याची ठरत होती. परिणामी, सुसज्य अशा नवीन इमारतीच्या निर्मितीचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आला होता. या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
जुनी इमारत तोडून त्याच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत तयार करताना कुंपनभिंत, बगीचा, वाहनतळ आदींची निर्मितीही करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी जुन्याच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत तयार होणार असल्याने जुनी इमारत पाडली जाणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सदर कार्यालयातील सुमारे १८ विभाग सिव्हील लाईन भागातील सध्याच्या जिल्हाकचेरी समोरील तहसील कार्यालयासाठी तयार केलेल्या नवीन इमारतीत येत्या डिसेंबर अखेर स्थलांतरील केले जाणार आहेत. त्यासाठी मार्ग मोकळा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित वरिष्ठ अधिकारी प्रयत्नही करीत आहेत.
१८ विभाग जाणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील इमारतीत
जुनी इमारत तोडून तेथे जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत तयार केली जाणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना, लेखा, नैसर्गिक आपत्ती, जमीन, नझुल, शेतकरी पॅकेज, लोकशाही दिन, बजेट, करमणुक कर, प्रेषक, वित्त, एनआयसी, सेतू, संगोया, गृह, न.पा. प्र., नियोजन, नाझर विभाग तहसील कार्यालयासाठी तयार केलेल्या नवीन इमारतीत स्थलांतरीत करण्यात येणार आहे. तेथूनच नवीन इमारत पूर्ण होईस्तोवर जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज चालणार आहे. शिवाय तहसील कार्यालयासाठी तयार केलेल्या नवीन इमारतीत हिवाळी अधिवेश संपताच जाण्यासाठी मार्ग मोकळा व्हावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी प्रयत्नही करीत आहेत.
खासदारांसह आमदारांनी रेटली नवीन इमारतीची मागणी
जिल्हाधिकारी कार्यालयाला सुसज्ज इमारत मिळावी म्हणून आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार यांच्यासह खा. रामदास तडस यांनी सरकार दरबारी प्रयत्न केले. राज्याचे वित्त मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयावर सकारात्मकता दर्शवित हा विषय मार्गी लागण्यास मदत केली आहे.
मुख्यमंत्र्यांचा वेळ घेण्याचा प्रयत्न सुरू
तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी तथा जिल्हाकचेरीच्या नवीन इमारतीच्या भुमिपूजनासाठी जिल्हास्तरावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा डिसेंबर अखेरचा वेळ मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Transfer of district collector in December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.