पारेषण कंपनीत गवत पेटले

By admin | Published: April 25, 2017 12:56 AM2017-04-25T00:56:34+5:302017-04-25T00:56:34+5:30

येथील नाचणगाव मार्गावरील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या पारेषण विभागातील गवताने पेट घेतला. वाऱ्याच्या झोतामुळे ही आग पसरली.

In the transmission company threw grass | पारेषण कंपनीत गवत पेटले

पारेषण कंपनीत गवत पेटले

Next

अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
पुलगाव : येथील नाचणगाव मार्गावरील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या पारेषण विभागातील गवताने पेट घेतला. वाऱ्याच्या झोतामुळे ही आग पसरली. याची माहिती लगेच केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या अग्निशामक दलाला देताच दलाच्या दोन गाड्या १४ कर्मचाऱ्यांसह दाखल झाल्या. जवळपास पाऊण तासात या आगीवर नियंत्रण मिळविले. अन्यथा ही आग मंडळाच्या जवळ असलेल्या झोपडपट्टीपर्यंत पोहचली असती व मोठा अनर्थ घडला असता. ही घटना सोमवारी दुपारी घडली.
राज्य विद्युत मंडळाची महावितरण व महापारेषण अशा दोन भागात विभागणी झाली. त्या काळापासून महावितरणचे कार्यालय पुलगाव तर महापारेषणचे देवळी येथे आहे. महावितरण परिसरच्या पुढे महापारेषणचा भाग असून या भागात ७ ते ८ फुट उंच गवत वाढलेले आहे. संरक्षण भिंतीच्या आतील महापारेषण परिसरातील गवताने आज पेट घेतला.
आग लागताक्षणी प्रशासनाने केंद्रीय दारू गोळा भांडाराच्या अग्निीशामक दलाला सूचना दिली. सूचना मिळताच फायरब्रिगेडच्या दोन गाड्या दाखल झाल्या. ब्रिगेड एडीएफओ आर.जी. वनकर यांच्या मार्गदर्शनात डी.डी. काळे, शेगावकर, चौधरी, प्रदीप जैन, शैलेश शर्मा, प्रदीप कुमार, आर.एन. लाल, निलेश करडवार, विजय येसनकर, राजू विजय, सुरेश कांबळे या कर्मचाऱ्यांनी मंडळाच्या मागील गेटने शिरून दोन्ही गाड्यातील पाण्याने चौफेर पाण्याचा मारा केला.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: In the transmission company threw grass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.