वाघांना जेरबंद करण्यासाठी लावला पिंजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:55 PM2018-03-07T23:55:15+5:302018-03-07T23:55:15+5:30

खरांगणा वनपरिक्षेत्राच्या सुसुंद नजीक शेळ्यांच्या कळपावर हल्ला करणारे वाघ हे कॅटरिना व तिचा बछडा असल्याची खात्री झाली.

The trapped cage to tie the tigers | वाघांना जेरबंद करण्यासाठी लावला पिंजरा

वाघांना जेरबंद करण्यासाठी लावला पिंजरा

Next
ठळक मुद्दे‘ते’ कॅटरिना व बछडा असल्याचे सुतोवाच

ऑनलाईन लोकमत
आकोली : खरांगणा वनपरिक्षेत्राच्या सुसुंद नजीक शेळ्यांच्या कळपावर हल्ला करणारे वाघ हे कॅटरिना व तिचा बछडा असल्याची खात्री झाली. यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना वनविभागाने पाचारण केले असून घटनास्थळी पिंजरा लावला आहे. परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
६ मार्च रोजी सकाळी १० वाजता सुसुंद गावानजीक नाल्यावर गावातील चार जण शेळ्या चारत होते. दरम्यान, वाघाच्या जोडीने कळपावर हल्ला करीत चार शेळ्यांचा फडशा पाडला. वनाधिकाऱ्यांनी भेट देत वाघाला जेरबंद करण्याकरिता घटनास्थळी पिंजरा लावला. रात्री १५ व दिवसा १५ कर्मचाºयांची गस्त लावली आहे. फटाके व बारूद फोडून वाघाच्या जोडीला हुसकावण्याचे प्रयत्न केले जात असले तरी घनदाट झाडी व थंडाव्यामुळे वाघ झुडपात लपून बसले आहे. त्यांनी चार शेळ्यांचा फडशा पाडला असून त्या संपेपर्यंत ते पिंजऱ्यातील बोकडाकडे येणार नसल्याचे वन सुत्राचे म्हणणे आहे. कॅटरिना व तिचा बछडा असल्याची खात्री झाल्याने काल बोर व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून त्यांना घटनास्थळी बोलविले. परिसरात दहशतीचे वातावरण असून वन कर्मचाºयांचा वावर आहे.

Web Title: The trapped cage to tie the tigers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ