नागपूर-हैदराबाद महामार्गावर ट्रॅव्हल्सची बसला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:53 AM2019-04-22T10:53:36+5:302019-04-22T10:54:59+5:30
हैद्राराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील शेडगाव चौरस्त्यावर ट्रॅव्हल्सने सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास एका बसच्या मागील भागाला जबर धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: नागपूर- हैद्राराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील शेडगाव चौरस्त्यावर ट्रॅव्हल्सने सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास एका बसच्या मागील भागाला जबर धडक दिली. या अपघातात अकरा प्रवासी जखमी झाले असून त्यात ९ शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार २२ फ्रेबुवारीला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास डि.एन.आर कंपनीची टॅÑव्हल्स क्रमांक एम एच ३४ ए.व्ही १२७७ ही भरधाव वेगाने चंद्रपूरकडून नागपुरला जात असताना याच वेळी वर्धा आगाराची वर्धा समुद्रपुर बस क्रमांक एम एच १४ बि.टी १२५२ ही बस समुद्रपुरकडे येत असताना बस शेडगाव रस्ता पार करीत असताना भरधाव वेगाने निघालेल्या ट्रॅवल्सने बसच्या मागील भागाला जबर धडक दिली. या धडकेमध्ये मांडगाव वरुण समुद्रपुर येथील शाळेत येत असलेले विद्यार्थी अपेक्षा घुसे, रश्मी घुसे, मयुरी डफ, मयुरी तडस, वैशाली भगत, अंजली तडस, वैष्णवी जोगे, वैष्णवी काटगुबे, सर्व राहणार मांडगाव व लता शास्त्रकार, बाबा शास्त्रकार, दोन्ही राहणार भुगाव व रामा विनायक बांधेकर रा नागपुर हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच जाम चौकी वरील महामार्ग पोलिस सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत क-हाडे, बंडु डडमल, दिनेश धवने, नागेश तिवारी, किशोर येळणे, देवैद्र पुरी, चंदु बन्सोड यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना उपचारासाठी समुद्रपुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलीस मार्गावर दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला करीत वाहतूक सुरळीत केली.