उपचार घेतल्यास क्षयरोग हमखास बरा होतो

By admin | Published: March 27, 2015 01:30 AM2015-03-27T01:30:21+5:302015-03-27T01:30:21+5:30

भारतात क्षयरुग्णाचे प्रमाण जास्त आहे. बरेच रुग्ण उपचार घेत असले तरीही अजून बरेच रुग्ण शोधून काढायचे आहेत.

Treatment makes TB sure right | उपचार घेतल्यास क्षयरोग हमखास बरा होतो

उपचार घेतल्यास क्षयरोग हमखास बरा होतो

Next

वर्धा : भारतात क्षयरुग्णाचे प्रमाण जास्त आहे. बरेच रुग्ण उपचार घेत असले तरीही अजून बरेच रुग्ण शोधून काढायचे आहेत. त्यांच्यावर संपूर्ण उपचार करावेत, हे कार्य करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. उपचार घेतल्यास हा रोग हमखास बरा होतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय मीना यांनी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मंगळवारला पार पडलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती मिलिंद भेंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. धुर्वे, डॉ. अंधारे, डॉ. निमोदिया, डॉ. कुचेवार, जिल्हा हिवताप अधिकारी मोनिका चारमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानंतर बोलताना भेंडे म्हणाले, ग्रामीण भागातून क्षयरुग्णाला पूर्ण उपचाराखाली आणणे गरजेचे आहे. त्याकरिता योग्य आरोग्य शिक्षण देण्यात यावे, आजही क्षयरुग्णाच्या बाबतीत अंधश्रद्धा जोपासल्या जातात. तसेच डॉ. निवृत्ती राठोड यांनी क्षयरोगावर पूर्ण उपचार, संतुलित आहार व योग्य व्यायाम केल्यास या रोगावर हमखास नियंत्रण मिळविता येते. क्षयरुग्ण हा पूर्ण बरा होतो, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी केले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात जागृतीपर विविध कार्यक्रमाचे घेण्यात आले. यात रॅलीतून क्षयरोगाची माहिती देणारा चित्ररथाचा समावेश करण्यात आला. जागृती रॅलीचा समारोप जिल्हा सामान्य रुग्णालय येथे करण्यात आला. यासह जिल्हा क्षयरोग कार्यालयात रांगोळी, पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांनी बक्षीस प्रदान केले.
यात रांगोळी स्पर्धेत प्रथम मंगला गुरनुले, द्वितीय आंचल कांबळे, तृतीय शितल राठोड तर शितल चांदकर, प्राची भस्मे यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच पोस्टर्स स्पर्धेत प्रथम राखी कोळसे, द्वितीय मेघा कांबळे, तृतीय शर्मिला उंबरे तर आरती वासेकर व निधी गुलकुंडे यांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र देवून गौरविले. उत्कृष्ठ डॉट्स प्रोव्हायडर म्हणून भीमराव मून, अर्चना चौधरी, ममता खासरे, अल्का गाटोळे, माधुरी ढोरे, कल्पना वानखडे, वंदना नौकरकर, अर्चना कोल्हे, इंदु खडसे यांना सन्मानित केले. तर उत्कृष्ठ औषधी अधिकारी म्हणून राम बोरसरे, तृप्ती देशमुख, तुषार धात्रक यांचा प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शेळके यांनी केले तर आभार डॉ. मानकर यांनी मानले. कार्यक्रमाला चंदन बोरकर, सोनटक्के, दुबे, जगताप, सारडे, वैरागडे, बेलूरकर, शेख, दाभाडे, उईके, अंधारे, रंगारी, पुरी आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Treatment makes TB sure right

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.