वृक्ष संवर्धन मानवासाठी अत्यावश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 10:14 PM2018-07-09T22:14:38+5:302018-07-09T22:14:56+5:30

स्थानिक ग्रामपंचायत भवनातून वृक्षदिंडीला खासदार रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार अनिल सोले यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

Tree culture is essential for humans | वृक्ष संवर्धन मानवासाठी अत्यावश्यक

वृक्ष संवर्धन मानवासाठी अत्यावश्यक

Next
ठळक मुद्देअनिल सोले : आंजी (मोठी) येथे वृक्षदिंडीचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
आंजी (मोठी) : स्थानिक ग्रामपंचायत भवनातून वृक्षदिंडीला खासदार रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार अनिल सोले यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प शासनाने जाहीर केला आहे.या काळात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व्हावे याकरिता ग्रीन अर्थ आॅर्गनाझेशन संस्था, जि.प.च्या शिक्षण सभापती जयश्री गफाट, व सरपंच जगदीश संचेरिया यांच्या पुढाकाराने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. तर उद्घाटक म्हणून आमदार तथा ग्रीन अर्थ आॅर्गनाझेशनचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.उपाध्यक्षा कांचन नांदुरकर, शिक्षण सभापती जयश्री गफाट, कृषी सभापती मुकेश भिसे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, सरपंच जगदीश संचेरिया, पं.स.सभापती महानंदा ताकसांडे, पं.स.सदस्य राजू डोळसकर, वंदना बावणे, जिल्हा नियोजन समितीचे सुनिल गफाट, वनविभागाचे बडेकर, मिलिंद भेंडे, जिल्हा संयोजक कामडी, इंद्रजीत बत्रा, दीपक बत्रा, व ग्रा.प. सदस्य उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन झाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सरपंच जगदीश संचेरिया यांनी गावातील वृक्ष लागवडीचे लक्ष्य व साध्य स्पष्ट करून गाव वृक्षारोपन व संवर्धनात अग्रेसर असल्याचे सांगितले. गावातील नरसाई गडावर निर्माण होणाऱ्या आॅक्सीजन पार्कची माहिती दिली.
सभापती जयश्री गफाट यांनी वृक्षदिंडीचे महत्व विषद केले. तर ग्रीन अर्थ आॅर्गनाझेशनचे प्रमुख तथा आमदार अनिल सोले यांनी वृक्ष लागवड संवर्धन आपल्यासाठी खूप अत्यावश्यक आहे. कारण जन्मापासून मृत्यूपर्यंत वृक्ष आपणास उपयोगी आहे. ते जगवून धरणी मातेचे ऋण फेडायचे आहे. असे प्रतिपादन केले.
तर अध्यक्षीय भाषणात खासदार तडस यांनी वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्व विषद केले. यावेळी वृक्षारोपण व संगोपन करणाºया व्यक्ती व संस्थांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये मुस्लीम कब्रस्थानमध्ये ३०० वृक्षांची लागवड करून संगोपन करणारे स्वातंत्र्य संग्राम सैनिक शेख रज्जाक मियॉ, अल्पसंख्याक विकास संस्थाचे संस्थापक मतिन शेख व मानवता बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष रफीक शेख यांचाही सत्कार करण्यात आला.
नॅशनल अ‍ॅडवेंजरद्वारा वृक्षारोपण व संवर्धन करणाºया भारती गोमासे, गर्ल्स हायस्कूलच्या हरित सेनेच्या संयोजिका मेहरे, सोशल मिडीयाद्वारे इवलस रोपट या कवितेतून जागरूकता करणारी रिता तपासे, हनुमान मंदिर देवस्थान परिसरात वृक्षारोपण करून जगविणारे समिती प्रमुख नरेश पचारे, संत अवधुतनाथ मठ परिसरात वृक्षारोपण करून संगोपन करणारे गजानन ताल्हन, आशिष वाटमोडे, किशोर ताल्हन, सत्यजीत काचेवार आदींचा सत्कार करण्यात आला.
यानंतर ग्रीन अर्थ आॅर्गनाझेशनचे जिल्हा संयोजक प्रशांती कामडी यांनी सर्व उपस्थितांना वृक्षारोपण संवर्धनची शपथ दिली. वृक्षदिंडीला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविली. दिंडीत शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, वनविभागाचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते, नागरिक महिला उपस्थित होते. संचालन मोहीन शेख यांनी तर आभार उपसरपंच नितीन भावरकर यांनी मानले.

नरसाई गडावर आॅक्सीजन पार्क
स्थानिक निसर्गरम्य नरसाई गडावर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या कल्पनेतून ग्रामपंचायत अंतर्गत रोहयोेतून वृक्षारोपण व संवर्धन करून आॅक्सीजन पार्क म्हणून विकसीत होणार आहे.
यामध्ये २००० वृक्ष लावण्यात येणार असून यामध्ये वनऔषधी, फळझाडे यांचाही समावेश होणार आहे.
पर्यटनस्थळ म्हणून विकसीत होत असून पिकनिक स्पॉटमध्ये विकसीत होईल.
मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून आॅक्सीजन पार्कच्या कार्याला सुरूवात झाली. या पार्कच्या विकासासाठी जि.प.सभापती जयश्री गफाट, सरपंच जगदीश संचेरिया प्रयत्नरत आहे.

Web Title: Tree culture is essential for humans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.