आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा मुहूर्त सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:53 PM2019-08-28T23:53:28+5:302019-08-28T23:54:28+5:30

सततच्या पाठपुराव्यामुळे वर्ध्यात प्रकल्प कार्यालय मंजुर झाले. पण, या कार्यालयाची इमारत आणि कर्मचाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाल्याने कार्यालयातून कामकाज सुरु करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या.

The tribal development project office was found | आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा मुहूर्त सापडला

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा मुहूर्त सापडला

googlenewsNext
ठळक मुद्देसोमवारी होणार श्रीगणेशा : आमदारांच्या निवासस्थानी समाजबांधवांचा जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला मंजुरी मिळाल्यानंतर या कार्यालयाचे कामकाज सुरु होण्याची प्रतीक्षा होती. अखेर बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत या कार्यालयाचे सोमवारी उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आदिवासी समाज बांधवांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या निवासस्थानी भेट देऊन ढोलताशांच्या गजरात जल्लोष करीत आमदारांचे आभार मानले.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधवांची संख्या असून या समाजबांधवांना विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता नागपुरच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात जावे लागत होते. त्यामुळे आमदार डॉ.पंकज भोयर यांनी वर्ध्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरु करण्याची मागणी केली होती.
सततच्या पाठपुराव्यामुळे वर्ध्यात प्रकल्प कार्यालय मंजुर झाले. पण, या कार्यालयाची इमारत आणि कर्मचाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाल्याने कार्यालयातून कामकाज सुरु करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे हा प्रश्न मांडल्याने मंगळवारी मंत्रीमंडळात या प्रकल्प कार्यालयाचा प्रश्न निकाली काढण्यात आला.
त्यासंदर्भातील पत्रही निर्गमित झाले असून येत्या सोमवारी उद्घाटन होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मोठा आनंद झाल्याने त्यांनी लागलीच आमदार डॉ. पंकज भोयर यांचे निवासस्थान गाठले.
तेथे गुलाल उधळीत हारतुऱ्यांनी आमदारांचे स्वागत केले. तसेच ढोलताशा वाजवून आमदारांसमवेत आनंदोत्सवही साजरा केला. यावेळी आदिवासी समाज बांधवांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यालयाकरिता ३६ पदांची आवश्यकता
वर्ध्याच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाकरिता ३६ पदे आवश्यक असून, त्यापैकी ३१ पदे अन्य कार्यालयातून वर्ग करुन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. चौकीदाराचे एक पद बाह्यस्त्रोताव्दारे भरण्यात येणार आहे. तसेच प्रकल्प अधिकारी, सहायक लेखा अधिकारी, कार्यालय अधिकारी व संशोधन सहायक ही चार पदे नवीन निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आदिवासी समाज बांधवांचा मुख्य प्रश्न सोडविण्यात यश आले; याचा मनस्वी आनंद होत आहे. रामनगर येथील प्रकल्पाच्या उपकार्यालयातच सध्या नवीन प्रकल्प कार्यालयाची सुरुवात होणार आहे. सोमवारी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यालयाला स्वतंत्र जागा देण्यासंदर्भात जिल्हाधिकाºयांना पत्र दिले असून जागाही सूचविण्यात आली आहे.
- डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा.

Web Title: The tribal development project office was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.