आदिवासी दैवत रावण पूजा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:03 PM2017-10-04T23:03:46+5:302017-10-04T23:03:56+5:30
बिरसा मुंडा क्रीडा संकुल आर्वी नाका आयटीआय टेकडी येथे आदिवासी दैवत राजा रावण पूजन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रावण पूजनानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बिरसा मुंडा क्रीडा संकुल आर्वी नाका आयटीआय टेकडी येथे आदिवासी दैवत राजा रावण पूजन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रावण पूजनानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापूराव उईके पाटील तर अतिथी म्हणून जि.प. सदस्य सरस्वती मडावी, प्रा. शिवाजी इथापे, मनोहर पंचारिया, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, मंगेश शेंडे, जि.प. सदस्य धनराज तेलंग, गजेंद्र सुरकार, प्रा. नूतन माळवी, अमिर अली अजानी, ज्ञानेश्वर ढगे, मदन चावरे, प्रशांत कुत्तरमारे, राजेश मडावी, तार खंडाते, निर्मला सलामे, मेघा उईके, लता टेकाम, मनोहर पंधरे, ज्ञानेश्वर मडावी आदी उपस्थित होते.
काकडे यांनी चुकीचा इतिहास सांगून बहुजन समाजाच्या युवकांची दिशाभूल करीत आहे. धर्मा-धर्मात, जाती-जातीत तेढ निर्माण करीत आहे. लिखानाद्वारे समाजप्रबोधन करणाºया व्यक्तींचे प्राण घेत त्यांचे विचार संपविण्याचा प्रयत्न होत आहे. महात्मा रावण यांचा दैदिप्यमान इतिहास असतानाही चुकीचा इतिहास सांगून बहुजन समाजाच्या युवकांच्या हाताने त्यांचे दहन करून आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जात आहे. याबाबत शासनने दहन करणाºयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. सरस्वती मडावी यांनी सर्व आदिवासी समाजाने संघटित होऊन अन्यायाविरूद्ध लढा देण्याची वेळ आली आहे. ज्या संघटना वा राजकीय पक्ष रावण दहन करीत असतील त्यांची भेट घेत त्यांचे मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करावा. याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन केले.
तेलंग यांनी आदिवासी समाज अजून शिक्षणाच्या प्रवाहात मागे आहे. आदिवासी समाजातील युवकांनी शिक्षणाचा लाभ घेवून महत्त्वाच्या पदावर जावे. याशिवाय समाजाचा विकास होणार नाही. त्याचप्रमाणे शासन आरक्षणाच्या बाबतीत अतिशय धोकादायक निर्णय घेतले असून शिष्यवृत्ती मिळणार नाही, याप्रमाणे कायदे बनवित आहेत. यामुळे आदिवासी समाजाने गावोगावी रावण पूजनाचा कार्यक्रम घेऊन समाज जागृती करावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत मसराम यांनी, संचालन हरिदास टेकाम यांनी केले तर उपस्थितांचे आभार अशोक धुर्वे यांनी केले. कार्यक्रमाला राजू मडावी, चंद्रभान खंडाते, चेतन पेंदाम, चंद्रशेखर मडावी, रामेश्वर आडे, नरेंद्र तोडासे, किशोर पेंदाम, नागोराव मसराम, विष्णू जुगनाके, मडावी, नंदकिशोर बिसने, विजय मरस्कोल्हे, अमृत मडावी, राजेंद्र मसराम, दादाराव इवनाथे, शंकर उईके, भरत कोवे, सुनील सलामे, दिगांबर पेंदाम, किसन कौरती, विठ्ठल इवनाथे, विनोद गेडाम, सचिन नराते, दिवाकर उईके, आशा टेकाम, सुनिता सयाम, अनिला मसराम, रंजना सलामे, योगिता युवनाथे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.