आदिवासी गोवारी बांधवांची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:32 AM2018-10-20T00:32:44+5:302018-10-20T00:37:51+5:30

गोवारी जमात ही आदिवासी आहे. गोंड गोवारी ही जातच अस्तित्वात नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने देऊन तब्बल दोन महिन्याचा कार्यकाळ संपला. तरी राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याने आज वर्धा जिल्ह्यातील......

Tribal people attacked Gawari brothers on duty | आदिवासी गोवारी बांधवांची जिल्हा कचेरीवर धडक

आदिवासी गोवारी बांधवांची जिल्हा कचेरीवर धडक

Next
ठळक मुद्देसत्याग्रह आंदोलन : आदेशाची अंमलबजावणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गोवारी जमात ही आदिवासी आहे. गोंड गोवारी ही जातच अस्तित्वात नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने देऊन तब्बल दोन महिन्याचा कार्यकाळ संपला. तरी राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याने आज वर्धा जिल्ह्यातील आदिवासी गोवारी बांधवांनी मूकमोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत सत्याग्रह आंदोलन केले.
राज्यातील आदिवासी गोवारी समाज हक्काचा लढा अनेक वषार्पासून लढत आहे. आपल्या न्याय मागणीसाठी ११४ गोवारीचे बळी जाऊनही शासनाने गोवारी समाजाचा प्रश्न सोडविला नाही. त्या अनुषंगाने उच्च न्यायालयात प्रकरणसुद्धा दाखल केले होते. अखेर १४ आॅगस्ट २०१८ रोजी गोवारी हे आदिवासीच असल्याबाबतचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. या निर्णयानंतर गोवारी समाजाला बऱ्याच वर्षांच्या संघर्षानंतर न्याय मिळाला. आता न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी राज्य शासनाने करावी, या मागणीसाठी आदिवासी गोवारी समन्वय समितीच्या वतीने राज्यभर सत्याग्रह आंदोलनांचा दुसरा टप्पा पार पडला. ११४ शहीद गोवारी स्मारकाच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर पोलिस मुख्यालया जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करुन मूकमोर्चाला सुरुवात करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेला हा मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आदिवासी गोवारी समाजाच्या महीला, पुरुष व विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्येकाने पिवळा शेला परिधान केला होता. जय सेवा , जय गोवारी, गोवारी एकता जिंदाबाद , गर्व से कहो हम आदिवासी हैं, भारत के मुल निवासी हैं, अशा घोषणा देऊन मूकमोर्चाला सुरुवात झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाºयांना निवेदन देतांना सुधाकर चामलाटे, देवराव पदिले, घनश्याम भीमटे, नरेश लोहट, रोशन राऊत, राजकुमार ठाकरे, दिनेश कुसराम, मंगेश एम. चौधरी, राजू राऊत, सोनु राऊत, ताराचंद नेवारे, विक्की लसुंते, सागर बोरजे, मोहन राऊत, रुपराव राऊत, साधना नेहारे, मधुकर राऊत, संतोष राऊत, निरंजन गुळभेले, विजय बोरजे, संजय नेहारे, रोशन दुधकोहळे, रोशन राऊत, लक्ष्मण राऊत, कृष्णाजी वाघाडे व तालुक्यातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे हा मोर्चा अडविण्यात आला होता.त्यानंतर या मूकमोर्चातील आदिवासी समाज बांधवांचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांच्या नावे विविध मागण्यांचे निवेदन दिले.

Web Title: Tribal people attacked Gawari brothers on duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.