आदिवासी बहुल गावाचा विकास साधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 09:06 PM2018-09-20T21:06:27+5:302018-09-20T21:07:32+5:30

मतदार संघातील आदिवासी बहुल गावातील नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांना सर्व सुखसोई उपलब्ध करुन देणे, ही माझी जबाबदारी आहे.

Tribal people will develop the village | आदिवासी बहुल गावाचा विकास साधणार

आदिवासी बहुल गावाचा विकास साधणार

Next
ठळक मुद्देपंकज भोयर : ग्राम स्वच्छता अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : मतदार संघातील आदिवासी बहुल गावातील नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांना सर्व सुखसोई उपलब्ध करुन देणे, ही माझी जबाबदारी आहे. त्याकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देत विकास साधणार असल्याचा विश्वास, आमदार डॉ. पंकज भोयर यांनी आमगाव (जंगली) गावातील नागरिकांना दिला.
सेलू तालुक्यातील आमगाव (जंगली) या आदिवासी बहुल गावात आयोजित ग्राम स्वच्छता अभियानादरम्यान मार्गदर्शन करतांना आमदार भोयर बोलत होते. अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी प्रवासी निवाऱ्याची मागणी केली होती. या मागणीची पुर्तता करीत आमदार भोयर यांनी ग्राम स्वच्छता अभियानानंतर प्रवासी निवारा व सिमेंट रस्त्याचे लोकार्पण केले. यावेळी नागरिक व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आ. भोयर म्हणाले की, खोटी आश्वासन देऊन जनतेचे समाधान न करता, जी कामे करुन शकतो तेच बोलतो आणि त्यांना पुर्णत्वास नेण्याचा पूर्णपणे प्रयत्नही करतो. म्हणून गावाच्या विकासासाठी दिलेल्या निधीतून होणारी कामे ही दर्जेदारच झाली पाहिजे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रत्येक नागरिकाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमादरम्यान मारोती आत्राम या ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते केक कापून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. यावेळी नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे समाधानही आमदारांनी केले. कार्यक्रमाला सरपंच शोभा सराम, जिल्हा परिषद सभपती सोनाली कलोडे, पंचायत समिती सभापती जयश्री खोडे, भाजपा तालुकाध्यक्ष अशोक कलोडे, जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा मलघाम, विनोद लाखे, उपसरपंच प्रकाश पिंपळे, विलास वरटकर, चंद्रशेखर वंजारी, ईश्वर खोबे, विजय खोडे, विलास नगराळे, स्वप्नील सराम, भारत मून, मिरा पेंदाम, पृथ्वी नगराळे, वर्षा होले, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी संजय वानखेडे, विस्तार अधिकारी सुशील बंसोड, ग्रामसेविका डोंगरे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटाचे सदस्य, गावातील नागरीक व तरुणांची उपस्थिती होती. यासर्वांनी ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग नोदविला.

Web Title: Tribal people will develop the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.