भारतीय स्टेट बँकेत दरोड्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:00 PM2018-01-27T22:00:38+5:302018-01-27T22:01:44+5:30

येथील भारतीय स्टेट बँकेत चोरट्यांकडून दरोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नात बँकेत असलेल्या अत्याधुनिक यंत्राच्या सहायाने पोलिसांना माहिती पोहोचल्याने चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला.

Trying to crack at State Bank of India | भारतीय स्टेट बँकेत दरोड्याचा प्रयत्न

भारतीय स्टेट बँकेत दरोड्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देसेंसरमुळे पोलिसांना मिळाली सूचना : आवाज होताच चोरटे पसार

आॅनलाईन लोकमत
समुद्रपूर : येथील भारतीय स्टेट बँकेत चोरट्यांकडून दरोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नात बँकेत असलेल्या अत्याधुनिक यंत्राच्या सहायाने पोलिसांना माहिती पोहोचल्याने चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडला.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता चोरटे दोराच्या सहायाने बँकेत वर चढले व गेट तोडून स्ट्राँगरूमपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. शिवाय त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वायर आणि हायअलर्ट प्रणाली नष्ट केल्याचेही दिसून आले. मात्र स्ट्राँग रूममध्ये असलेल्या सेंसरमुळे चोरट्यांचा डाव फसल्याचे समोर आले. शहरातील बँक फोडण्याचा प्रयत्न झाल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
२५ जानेवारी रोजी रात्री १.१२ वाजता समुद्रपूर पोलीस ठाण्याचा फोन वाजला की बँकमध्ये काहीतरी झाले. शिवाय तसा संदेशही आला. संदेश येताच सुरक्षा रक्षत जाधव हे बँक परिसरात पोहचले असता त्यांना बँकेचे मुख्य शेटर बंद दिसले. यावेळी त्यांनी इकडे तिकडे पाहले असता काहीच दिसले नाही. बँकेत उंदरांचा उद्रेक झाल्याने संदेश आला असावा असे त्यांना वाटले. याच वेळी पोलिसांनी बँकेत पोहोचत बँकेचे शेटर उघडले असता बँकेचे चॅनल गेट तोडल्याचे लक्षात आले.
२६ जानेवारीला सकाळी वर्धेवरून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. या वेळी श्वान हा बँक परिसरात १०० फुट जात मागे परत येत होता. यावरुन असे निर्दशनात येते की चोरटे आपले वाहन बँक परिसरातुन हिंगणघाट-उमेरड मार्गावर उभे ठेऊन ते तिथुनच पसार झाले असावे असा संशय आहे.
बँकेच्या बाहेरील परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता दोन चोरटे मंकीक्याप घालून असल्याचे निदर्शनात येते; मात्र पुढे त्यांनी वायर कापल्याने फुटेज दिसत नाही. यावरून चोरटे सराईत असल्याचे दिसून येते. यामुळे पोलिसांच्या हाती काहीच सुगावा लागला नाही. या प्रकरणी समुद्रपूर पोलिसात गुन्हा दाखल केला असून तपास ठाणेदार प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक प्रविण लिंगाडे, पोलिस उपनिरीक्षक उमेश हरणखेडे, उपनिरीक्षक अशोक चंहांदे, चांगदेव बुरीले, चन्द्रशेखर रोहनकर, भगत, अजय घुसे, चेतन पीसे शेखर नेहारे, राजू जयसिंगपुरे, वीरेंद्र कांबळे, रंजना झिलपे, शीतल धबर्डे, आदी करीत आहेत.
सीसीटीव्हीचे वायर कापले
बँकेत पाहणी केली असता चोरट्यांनी बँक इमारतीवर दोराचे सहायाने चढुन छतावरील जिन्याचे लोंखडी दार गँस कटरच्या सहायाने कापून प्रवेश केल्याचे निर्दशनात आले. चोरट्यांनी सर्व प्रथम हायअलर्ट करणाऱ्या आलारामचा वायर कापला व नंतर तीन सीसीटीव्ही कॅमेºयाचे वायर कापूस बँकेच्या स्ट्रॉगरुमपर्यंत पोहचण्याची मजल मारली. मात्र येथे स्ट्रॉग रुमच्या सेंसरने पोलीस व सुरक्षा रक्षकाला अलर्ट केल्याने बँकेतील मोठी चोरी टळली.
बँकेत २५ लाखांची रोख
च्बँक प्रभारी शाखा व्यवस्थापक अनिल उमरेडकर यांनी दिलेल्या माहीती नुसार बँकमध्ये या वेळी २५ लाख रुपये होते.

Web Title: Trying to crack at State Bank of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.