जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:34 AM2017-07-19T00:34:08+5:302017-07-19T00:34:08+5:30
मुलीला पळवून नेत लग्न केल्याने नरेश कंबाले याच्यावर चाकूहल्ला केल्या प्रकरणी अंकुश भुजंगराव राऊत याला
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मुलीला पळवून नेत लग्न केल्याने नरेश कंबाले याच्यावर चाकूहल्ला केल्या प्रकरणी अंकुश भुजंगराव राऊत याला भादंविच्या कलम ३०७ अन्वये सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. सदर निकाल जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधिश संध्या रायकर यांनी मंगळवारी दिला.
घटनेची थोडक्यात हकीगत अशी की, नरेश कंबाले याने अंकुश राऊत याच्या मुलीला पळून नेऊन लग्न केले. त्यावर चिडून जावून त्याने २० मे २०१४ रोजी सेलू ठाण्यांतर्गत वडगाव मार्गावर नरेश कंबाले याला जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने मारून जखमी केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून गुन्हाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात जिल्हा शासकीय अभियोक्ता जी.व्ही. तकवाले यांनी शासनातर्फे बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी सहायक फौजदार संजय पडोळे यांनी साक्षदारांना हजर करुन मोलाची कामगिरी बजावली. साक्षपुरावे व युक्तीवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधिश रायकर यांनी आरोपीस शिक्षा सुनावली.