अवैध व्यवसाय सोडून सन्मानाचे जीवन देण्याचा प्रयत्न

By admin | Published: June 28, 2016 01:56 AM2016-06-28T01:56:05+5:302016-06-28T01:56:05+5:30

जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या नवजीवन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे.

Trying to leave an illegal business and give life to honor | अवैध व्यवसाय सोडून सन्मानाचे जीवन देण्याचा प्रयत्न

अवैध व्यवसाय सोडून सन्मानाचे जीवन देण्याचा प्रयत्न

Next

पोलिसांच्या नवजीवन योजनेचा दुसरा टप्पा : पारधी समाजातील महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण
वर्धा : जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या नवजीवन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात या समाजाच्या काही महिलांना फिनाईल बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने पारधी समाजातील महिलांकरिता वंदना फाऊंडेशन, चरखा केंद्र येथे रोजगाराचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.
दारू गाळणे व चोऱ्या करणे असा ठप्पा पारधी समाजावर लागला आहे. त्यांच्याकडून होत असलेल्या या व्यवसायामुळे समाजाला धोका असल्याचे म्हणत त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येते; मात्र त्यांच्या पुनरूज्जीवणाकरिता कोणत्याही विशेष योजना राबविण्यात येत नाही; मात्र या पारधी समाजातील महिलांना सन्मानाने जगता यावे, त्यांची दारू गाळणारा समाज ही ओळख मिटविण्याकरिता या महिलांना जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने नवजीवन योजनेच्या माध्यमातून रोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. वर्धेत सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणात पांढरकवडा पारधी बेड्यावरील महिला सूत कताईचे धडे घेत आहेत. उद्घाटन कार्यक्रमाला वंनदा फाऊंडेशन येथील अधिकारी, कर्मचारी व पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व पांढरकवडा पारधी बेड्यावरील महिला प्रशिक्षणार्थी हजर होते.(प्रतिनिधी)

पारधी समाजाच्या महिलांकडून फिनाईल विक्री
४जिल्हा पोलिसांकडून या महिलांना सन्मानाचे जीवन देण्याकरिता पहिल्या टप्प्यात फिनाईल बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याच्याकडून या प्रशिक्षणातून फिनाईल बनविण्याचा व्यवसाय सुरू झाला असून त्यांनी निर्माण केलेले फिनाईल बाजारात विक्रीकरिता आले आहे. त्यातून त्यांच्या नवजीवनाला प्रारंभ झाला आहे.

Web Title: Trying to leave an illegal business and give life to honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.