क्षयरोग सप्ताहाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 08:59 PM2018-03-24T20:59:37+5:302018-03-24T20:59:37+5:30
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध क्षयरोग केंद्रात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. क्षयरोग दिनानिमित्त गांधी मेमोरिअल लेफ्रसी फाउंडेशन येथून प्रभात काढण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध क्षयरोग केंद्रात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. क्षयरोग दिनानिमित्त गांधी मेमोरिअल लेफ्रसी फाउंडेशन येथून प्रभात काढण्यात आली. या फेरीम क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली. या प्रभात फेरीचा समारोप जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणात झाला. याच मैदानात गत आठ दिवसात झालेल्या कार्यमांचा समारोपही करण्यात आला.
२४ मार्च १८८२ रोजी डॉ. रॉर्बट कॉक यांनी क्षयरोगाच्या जंतूचा शोध लावल्यामुळे क्षयरोगाचा उपचार करणे शक्य झाले. यामुळे जगभरात २४ मार्च ‘जागतिक क्षयरोग दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील सर्व डीएमसीमध्ये क्षयरोग दिनाचा कार्यक्रम झाला.
सकाळी ८ वाजता गांधी मेमोरिअल लेफ्रसी फाउंडेशन येथून प्रभात फेरी प्रारंभ करून क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली. या प्रभात फेरीचा समारोप जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणात झाला. याच वेळी कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. आरोग्य सभापती जयश्री गफाट, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, अतिरिकत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. पारेकर, डॉ. रेवतकर, डॉ. सचिन पावडे, डॉ. प्रविण धाकटे, डॉ. शंतनु चव्हाण, डॉ. राजेश सरोदे, डॉ. स्वाती पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी उत्कृष्ठ डॉट प्रोव्हायडर, उत्कृष्ठ खासगी वैद्यकीय व्यावसायिक व खासगी औषधी विक्रेते प्रफुल ठाकरे, श्रीधर जाजुदिया, विनय मोरे, विशाल पोखरे, विनोद मोनानी, राज बाराई उपस्थित होते. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व पोस्टर्स स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त स्पर्धकांना स्मृतीचिन्ह, प्रशस्ती पत्र व रोख देत गौरविण्यात आले.
याप्रसंगी डॉ. पुरुषोत्तम मडावी म्हणाले, या वर्षीच्या घोषवाक्यानुसार सर्वांनी पुढाकार घेत सन २०२५ पर्यंत क्षयमुक्त भारत करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. सन २०१८-१९ या वर्षात क्षयरुग्णांना दरमहा मिळणाºया ५०० रुपये मानधनाकरिता आरोग्य विभागातील सर्वांनी क्षयरुग्णांना औषधी नियमित व वेळेवर घेण्याकरिता सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली.
प्रास्ताविक डॉ. स्वाती पाटील यांनी केले. संचालन सुमंत ढोबळे यांनी केले तर आभार जितेंद्र बाखडे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता अक्षया प्रोजेक्टचे चंद्रशेखर व त्यांचे सहकारी व सुराक्षनिका अंतर्गत सर्व कर्मचारी सोनटक्के, पुनवटकर, शेळके, सारडे, जगताप व जिल्हा सामान्य नर्सिंग स्कूल वर्धा येथील प्रशिक्षणार्थ्यांनी सहकार्य केले. तसेच जिल्हा क्षयरोग केंद्र वर्धा येथील अधिकारी डॉ. मानकर व कर्मचारी रामटेके, पराड, दांडेकर, वासनिक, वैरागडे, श्रीराम राठोड, दाभाडे, मुन्ना अखतर, अनिल, किशोर आदींनी सहकार्य केले. यावेळी शहरातील विविध नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.