तूर विके्रत्या शेतकऱ्यांना लवकरच चुकारे मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 11:58 PM2018-04-13T23:58:54+5:302018-04-13T23:58:54+5:30

जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकºयांचे कोट्यावधीचे चुकारे थकले आहेत. चुकारे नसल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे तुरीचे चुकारे तत्काळ देण्यात यावे, .....

 Ture sellers will soon get a quick punch | तूर विके्रत्या शेतकऱ्यांना लवकरच चुकारे मिळणार

तूर विके्रत्या शेतकऱ्यांना लवकरच चुकारे मिळणार

Next
ठळक मुद्देदेशमुख यांची मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकºयांचे कोट्यावधीचे चुकारे थकले आहेत. चुकारे नसल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे तुरीचे चुकारे तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांनी मुंबई येथे मार्केटींग फेडरेशनचे व्यवस्थापक कल्याण कानडे यांना निवेदनातून केली.
यंदा निसर्गाच्या माºयासह शासकीय नियमांच्या पेचात बळीराजा सापडला आहे. पिकांवर झालेल्या रोगांमुळे व आता निघालेल्या पिकाच्या मोबदल्यासाठी त्याची भटकंती सुरू आहे. शासनाने शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे या भरपूर जाहीर केले. परंतु, शेतकºयांचा सातबारा अद्यापही कर्जमुक्त झाला नाही. यामुळे तो नव्या कर्जापासून वंचित आहे. त्याच्यावर सावकाराच्या दारात जाण्याची वेळ आली आहे. कसेबसे त्याने पीक घेतले असता त्याला त्यांच्याच पिकाचा मोबदला मिळण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. हा प्रकार निंदनिय आहे. आर्वी येथून एकूण १ हजार ८९०, आष्टी येथून ८२६ व कारंजा येथून १ हजार ५८८ शेतकºयांनी नाफेड करीता नोंदणी केलेली असून अजूनपर्यंत जवळपास आर्वी तालुक्यातील १ हजार २०० आष्टी तालुक्यातील ५२६ व कारंजा तालुक्यातील ४४७ शेतकºयांना चुकारे मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या शेतकºयांच्या प्रश्नांना तात्काळ सोडविण्यात यावे, या मागणीकरिता निलेश देशमुख यांनी थेट मुंबई गाठली. त्यांनी मार्केटींग फेडरेशनचे व्यवस्थापक कल्याण कानडे यांची भेट घेत त्यांना संपूर्ण प्रकार समजावून सांगितला. शेतकºयांच्या विकलेल्या तुरीचे देयक तत्काळ अदा करावा, अशा मागणीचे निवेदनही दिले. त्यावर कानडे यांनी शेतकºयांना त्याच्या शेतमालाचे देयक येत्या ४ ते ५ दिवसाच्या आत देण्यात येईल असे आश्वासन दिले.

Web Title:  Ture sellers will soon get a quick punch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.