कर्ज वसुली बंद करा

By Admin | Published: March 22, 2017 12:57 AM2017-03-22T00:57:51+5:302017-03-22T00:57:51+5:30

तालुक्यातील शेतकरी मागील ४ वर्षापासून दुष्काळाच्या चक्रात अडकले असतांना बॅकेमार्फत कर्ज वसुली सुरू आहे.

Turn off the loan recovery | कर्ज वसुली बंद करा

कर्ज वसुली बंद करा

googlenewsNext

निखिल कडू यांची निवेदनातून मागणी
आर्वी : तालुक्यातील शेतकरी मागील ४ वर्षापासून दुष्काळाच्या चक्रात अडकले असतांना बॅकेमार्फत कर्ज वसुली सुरू आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ आणि कधी गारपिटीने शेतकऱ्यांचे कमरडे मोडले आहे. शेती उभारण्याकरीता तसेच शेती पुरक साधन खरेदी करीता बँकेकडून घेतलेल्या कजार्ची परतफेड करणे शेतक-यांना आजच्या घडीला शक्य नाही. आर्थिक अडचणीने शेतक-यांना जिवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे सक्तीने सुरू असलेली कर्ज वसूली तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
पूर्वीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती नाजुक आहे. बँकेकडून कर्ज भरण्यासाठी तगादा लावल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या संकटात वाढ झाली आहे. शेतीकरीता कर्ज घेऊन घेतलेले ट्रॅक्टर आदी साहित्य जप्त करणे सुरू आहे. विविध बँका कर्जवसुलीकरिता शेतकऱ्यांना धारेवर धरत आहेत. यात महाराष्ट्र बँक पुढे आहे. शेतकऱ्यांना शेती व्यतिरिक्त उपजिविकेसाठी कुठलाही दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यातूनच ते मुलांचे शिक्षण, मुला-मुलींची लग्न, कुटुंबाचे पालनपोषण करतात. सध्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना कुटुबाचे पालन-पोषण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. कर्ज वसुली बाबत जर बॅकेचे असेच धोरण असेल तर शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्नदात्यालाच बँकेकडून कर्जवसूलीकरिता नाहक त्रास दिल्या जात आहे. या सर्व बाबींचा विचार करून बँकेमार्फत शेतकऱ्याची कर्ज वसुली तात्काळ बंद करावी, अशी मागणी सर्कसपूरचे उपसरपंच तथा भाजपा पदाधिकारी निखिल कडू यांनी निवेदनातून केली आहे. मागणीचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून करण्यात आला आहे.(तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: Turn off the loan recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.