रात्रीचे थ्री-फेज भारनियमन बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:00 AM2017-10-25T01:00:53+5:302017-10-25T01:01:14+5:30

मागील बारा दिवसांपासून रात्रीच्या वेळी थ्री -फेज भारनियमन सुरू आहे. यामुळे पिकांना ओलित करणे बंद झाले आहे.

Turn off the three-phase load regulation | रात्रीचे थ्री-फेज भारनियमन बंद करा

रात्रीचे थ्री-फेज भारनियमन बंद करा

Next
ठळक मुद्देमागील बारा दिवसांपासून रात्रीच्या वेळी थ्री -फेज भारनियमन सुरू आहे



लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (श.) : मागील बारा दिवसांपासून रात्रीच्या वेळी थ्री -फेज भारनियमन सुरू आहे. यामुळे पिकांना ओलित करणे बंद झाले आहे. पुर्वीचे वेळापत्रक कायम ठेवा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शेतकºयांनी मंगळवारी वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यासह तहसीलदार तथा ठाणेदारांना दिला आहे.
बारा दिवसांपासून थ्री-फेज भारनियमनाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. हे वेळापत्रक पाहता आठवड्यातील चार दिवस शेतकºयांनी पिकांचे सिंचन करूच नये, असाच संदेश दिला जात असल्याचे दिसते. हा प्रकार अन्यायकारक आहे. याचा शेतकरी स्वीकार करू शकत नाही. पूर्वी सोमवार ते गुरूवारी रात्रीचा वीज पुरवठा ११.४५ ते सकाळी ९.४५, असा होता. यामुळे किमान ३ तास ओलित करता येत होते; पण नव्याने दिलेल्या वेळापत्रकात रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत भारनियमन केल्याने चार दिवस ओलित करणे शक्य नाही. पहाटेच्या वेळी शेतकरी शेतात जाऊ शकत नाहीत. यामुळे शेतकºयांनी चार दिवस ओलित करू नये, असा दुष्ट हेतू असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. सध्या उन्हाची तिव्रता वाढत असल्याने कपाशीला पाणी देणे गरजेचे आहे. रबी हंगाम सुरू झाल्याने हरभरा पिकासाठी ओलिताची गरज आहे. आधीच शेतमालाचे भाव कवडीमोल झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. रबी हंगामासाठी दिलेले वेळापत्रक अन्यायकारक असून ते मागे घ्यावे. सात तासाऐवजी चार तास वीज द्यावी; पण दिवसा द्यावी वा पुर्वीचे वेळापत्रक कायम ठेवावे, अशी मागणी केली. निवेदनाची दखल न घेतल्यास १ नोव्हेंबर रोजी येथील वीज कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी अशोक विजयकर, वासुदेव कपले, दिलीप पोकळे, शेषराव राणे, फजल खान, दिलीप राणे, दीपक बोंडे, सुनील देशमुख, अशोक शिरभाते, प्रशांत सिसट, कैलास आढे, विलास बानाईत, अफाज खान, जगदीश कनेर, यशवंत पोकळे, शेर खा पठाण, इखार आदी उपस्थित होते.

Web Title: Turn off the three-phase load regulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.