कापूस खरेदी बंद असल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 04:40 AM2017-10-21T04:40:26+5:302017-10-21T04:40:38+5:30

दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारच्या कापूस पणन महासंघाची व सीसीआयची कापूस खरेदी सुरू न झाल्याने शेतक-यांना कापूस विक्रीसाठी अडचण निर्माण झाली आहे.

 Turning the farmers off due to close shopping | कापूस खरेदी बंद असल्याने शेतकरी अडचणीत

कापूस खरेदी बंद असल्याने शेतकरी अडचणीत

Next

 वर्धा : दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारच्या कापूस पणन महासंघाची व सीसीआयची कापूस खरेदी सुरू न झाल्याने शेतक-यांना कापूस विक्रीसाठी अडचण निर्माण झाली आहे. विदर्भात अनेक भागात दिवाळीच्यापूर्वी कापूस निघण्यास सुरूवात होते. शेतकरी दिवाळीला कापूस विक्री करून पैसे मिळवितो. मात्र यंदा केंद्र सरकारच्या कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने राज्यात कापूस खरेदी केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे व्यापाºयांची खेडा खरेदी जोरात सुरू झाली आहे. यात शेतकºयांना अत्यल्प भाव देवून नगदी पैशाने कापूस खरेदी करण्यात येत आहे.
राज्यात उत्पादन होणा-या कापसात ७८ टक्के कापूस एकट्या विदर्भात उत्पादन होतो. विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात कापसाचे पीक घेतले जाते. बरेच शेतकरी मृग नक्षत्राच्यापूर्वी धुळपेरणी करीत असल्याने त्यांच्याकडे दसºयानंतर कापूस निघण्यास सुरूवात होते. यंदा कापसाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता कृषी खात्याने वर्तविली आहे. अनेक शेतकºयाच्या घरी कापूस आलेला आहे. मात्र सरकारचे कापूस खरेदीबाबत धोरण अद्यापही ठरलेले नाही. 
१९ सप्टेंबर रोजी कापूस पणन महासंघाची मुंबई येथे वार्षिक आमसभा पार पडली. या आमसभेत कापूस खरेदीबाबत निर्णय घेण्यात आला. यात कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडिया राज्यात कापूस खरेदी करेल व कापूस पणन महासंघ नोडल संस्था म्हणून कमिशन तत्वावर काम करेल, असे ठरविण्यात आले. दिवाळीपूर्वी सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू होईल, अशी आशा शेतकºयांना होती. परंतु राज्यात कोठेही कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतक-यांना आता व्यापा-यांना कापूस विकण्याची पाळी आली आहे. शेतक-यांकडून अल्प दराने व्यापारी कापूस घेत आहे. यंदा कापसाचा भाव ५ हजार रूपये क्विंटलच्यावर राहण्याची शक्यता आहे. कापूस उत्पादन करणाºया जगातील अनेक देशात या वर्षी वादळामुळे व नैसर्गिक अडचणीमुळे कापसाचे उत्पादन घटलेले आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेतील कापसाला मोठी मागणी राहणार आहे. 
त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीसीआयचे कापूस खरेदी तत्काळ सुरू करण्याची गरज होती. मात्र केंद्र सरकारची कमालीची उदासिनता याबाबत दिसून येत आहे. 

Web Title:  Turning the farmers off due to close shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.