कत्तलीसाठी जाणाऱ्या बारा जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 09:59 PM2019-03-13T21:59:27+5:302019-03-13T21:59:43+5:30

नागपुरहून अमरावतीकडे कत्तलीसाठी जाणाऱ्या ६ गायी व ६ कालवडींची पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई बुधवारी पहाटे अफजलपूर शिवारात करुन वाहनासह जनावरे ताब्यात घेतली.

Twelve animals released for slaughter | कत्तलीसाठी जाणाऱ्या बारा जनावरांची सुटका

कत्तलीसाठी जाणाऱ्या बारा जनावरांची सुटका

Next
ठळक मुद्देवाहन सोडून आरोपी फरार : अफजलपूर शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.): नागपुरहून अमरावतीकडे कत्तलीसाठी जाणाऱ्या ६ गायी व ६ कालवडींची पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई बुधवारी पहाटे अफजलपूर शिवारात करुन वाहनासह जनावरे ताब्यात घेतली.
तळेगाव पोलीस पेट्रोलींगवर असताना एका पिकअप वाहनात जनावरे कोंबून अमरावतीकडे जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पिकअप वाहनाचा पाठलाग केला असता वाहनचालकाने पोलिसांनी नजर चुकवून अफजलपूर शिवार गाठले. पोलिसांनीही अफजलपूर शिवाराकडे आपले वाहन वळविले. पोलिसांचा सुगावा लागताच एका सागाच्या वनात वाहन सोडून आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी एम.एच.२२ ए.ए १२३२ क्रमांकाचे वाहन ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली. तेव्हा वाहनात ६ गायी व ६ कालवडी चारा-पाण्यामुळे व्याकूळ होऊन मरणासन्न अवस्थेत दिसून आल्या. त्या जनावरांना बाहेर काढून त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी ३ लाख रुपयाचे वाहन व ९० हजार रुपयांचे जनावरे असा एकूण ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच वाहनाच्या चालक-मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रवि राठोड, पोलीस उपनिरीक्षक रवि मनोहर, संजय शिंगणे, निलेश पेटकर, सचिन साठे, विजय उईके, रोशन धाये, अंकुश रामटेके, कैलास चौबे यांनी केली.

Web Title: Twelve animals released for slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.