बसच्या तिहेरी अपघातात १२ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:51 PM2017-11-15T23:51:06+5:302017-11-15T23:51:42+5:30

दोन मालवाहु ट्रक व एसटी बस यांच्यातील तिहेरी अपघातात बसमधील बारा प्रवासी जखमी झाले. हा अपघात यवतमाळ मार्गावरील ईसापूर शिवारात बुधवारी दुपारी १.२५ च्या सुमारास घडला.

Twelve passengers were injured in a bus crash | बसच्या तिहेरी अपघातात १२ प्रवासी जखमी

बसच्या तिहेरी अपघातात १२ प्रवासी जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देईसापूर शिवारातील अपघात : बस चालक व वाहक गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : दोन मालवाहु ट्रक व एसटी बस यांच्यातील तिहेरी अपघातात बसमधील बारा प्रवासी जखमी झाले. हा अपघात यवतमाळ मार्गावरील ईसापूर शिवारात बुधवारी दुपारी १.२५ च्या सुमारास घडला. बसमधील सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसचालक व वाहक, हे दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले.
पोलीस सुत्रानुसार, बस व दोन्ही मालवाहु ट्रक एकाच दिशेने नागपूरकडे जात असताना हा अपघात झाला. उमरेड डेपोची बस क्र. एमएच ४० वाय ५१६० ही यवतमाळमार्गे नागपूरकडे जात होती. दरम्यान, बसच्या मागाहून सोयाबीन घेऊन भरधाव येणाºया मालवाहू ट्रक क्र. एमएच २९ एमओ ५०८ ने बसला जबर धडक दिली. या धडकेमुळे अनियंत्रित झालेली बस समोर असलेल्या तुरीच्या ट्रक क्र. सीजी ०४ जेडी ९०३९ वर आदळली. या अपघातात बसच्या दोन्ही बाजूला जबर धडक बसल्याने बारा प्रवासी जखमी झाले. काही गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात हलविले.
जखमींमध्ये गायत्री धोटे व गणेश देशकर रा. देवळी, विशाल वाघाडे व चंद्रकला मारोती गिरी रा. कळंब, तुफान जाधव आर्णी, बेबी भोळे कामरवाडा, मयूरी कुथे नेरी, भारती माने हिवरा, नारायण पारिसे तांबा, कुसूम नागरे यवतमाळ, श्रीकृष्ण पेंदाम व पुनम बर्धिया वातोडा यांचा समावेश आहे. प्रत्यक्षदर्शीनुसार अपघातानंतर बसमधील प्रवासी घाबरले होते. लोकांनी जखमींना खासगी, सरकारी वाहनाने रुग्णालयात पाठविले. या अपघाताची नेमकी उकल झाली नसल्याने पोलिसांनी अंदाजे घटनाक्रम विषद केला. जखमींचे बयाण व चौकशी अंती गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन दराडे यांनी सांगितले.

Web Title: Twelve passengers were injured in a bus crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात