डिसेंबरच्या अकरा दिवसांत बारा व्यक्तींचा कोविडने घेतला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 05:00 AM2020-12-13T05:00:00+5:302020-12-13T05:00:13+5:30
मागील अकरा दिवसांच्या काळात जिल्ह्यात तब्बल ४६८ नवीन कोविड बाधित सापडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या आता ८ हजार ३२९ झाली आहे. तर मागील अकरा दिवसांत बारा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोविड मृतकांचा आकडा २६१ झाला आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या मृत्येचे ‘’’’डेथ ऑडिट’’’’ सध्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. त्याचा अहवाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा पातळीसह गावपातळीवर विविध प्रयत्न होत असले तरी मागील अकरा दिवसांच्या कालावधीत तब्बल बारा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.
मागील अकरा दिवसांच्या काळात जिल्ह्यात तब्बल ४६८ नवीन कोविड बाधित सापडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या आता ८ हजार ३२९ झाली आहे. तर मागील अकरा दिवसांत बारा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोविड मृतकांचा आकडा २६१ झाला आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या मृत्येचे ‘’’’डेथ ऑडिट’’’’ सध्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. त्याचा अहवाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मागील अकरा दिवसांचा विचार केल्यास ६६७ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत ७ हजार ७६७ व्यक्तींनी कोविडवर विजय मिळविला आहे. असे असले तरी दिवसेंदिवस कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनीही दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे क्रमप्राप्त असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
जिल्ह्याचा मृत्यूदर राज्याच्या बरोबरीनेच
सध्या राज्याचा कोविड मृत्यू दर २.५७ टक्के असल्याचे सांगण्यात येते. असले तरी राज्याच्या बरोबरीनेच वर्धा जिल्ह्याचा मृत्यू दर सध्या कायम असल्याने आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. जिल्ह्याचा कोविड मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच रिकव्हरी दरात वाढ करण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.
कोरोना टेस्टची गती मंदावली
ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यात सध्या कोविड चाचण्यांची गती मंदावल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. आरटीपीसीआर पद्धतीचा अवलंब करीत २०० पेक्षा जास्त कोविड चाचण्या करण्याची आमची अधिकची श्रमता नाहीच असे जिल्ह्यातील दोन्ही प्रयोगशाळांमधील अधिकाऱ्यांकडून आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना सध्या सांगितले जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागालाही ॲन्टिजेन पद्धतीचा अवलंब करून अधिकाधिक कोविड टेस्ट कराव्या लागत आहेत.