वर्धा जिल्ह्यात दोन दुचाकींची समोरासमोर धडक: दोन व्यक्ती गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2023 21:12 IST2023-04-03T21:12:34+5:302023-04-03T21:12:58+5:30
Wardha News समुद्रपुर तालुक्यातील जाम समुद्रपुर मार्गावरील रेनकापुर येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन दुचाकी गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

वर्धा जिल्ह्यात दोन दुचाकींची समोरासमोर धडक: दोन व्यक्ती गंभीर जखमी
वर्धाः समुद्रपुर तालुक्यातील जाम समुद्रपुर मार्गावरील रेनकापुर येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन दुचाकी गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
आज सोमवारी ३ एप्रिलला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास आरंभा येथील रहिवासी अखिल कन्नाके आपल्या दुचाकी क्रमांक MH 32 AD 6939 ने जात असताना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील रहिवासी प्रवीण वारके यांची दुचाकी क्रमांक M H 34 AY 9664 ची रेनकापुर येथे समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात प्रवीण वारके व अखिल कन्नाके हे दोघेही गंभीर जखमी झाले.
दोन्ही जखमींना उपचारासाठी समुद्रपुर येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले.