वीज पडून दोन जनावरे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:53 PM2018-08-17T23:53:20+5:302018-08-17T23:53:40+5:30
तालुक्यातील घोन्सा (रासा) गावात वीज पडल्याने दोन जनावरे भाजल्याने जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी उशीरा घडली. या घटनेत शेतउपयोगी साहित्यासह वैरण जळून कोळसा झाल्याने शेतकरी संदीप पडवे यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्यातील घोन्सा (रासा) गावात वीज पडल्याने दोन जनावरे भाजल्याने जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी उशीरा घडली. या घटनेत शेतउपयोगी साहित्यासह वैरण जळून कोळसा झाल्याने शेतकरी संदीप पडवे यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.
गुरूवारी परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण असताना अचानक वीज घरावर कोसळली. सदर घटना लक्षात येताच घरातील छबू पडवे, जगदीश पडवे यांनी घराबाहेर पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण करीत घरातील साहित्याला आपल्या कवेत घेतले. आगीत शेतउपयोगी साहित्य व वैरण जळून खोळसा झाले. तसेच दोन जनावरे जखमी झालेत. या घटनेत शेतकरी संदीप पडवे यांचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात तब्बल अर्ध्यातासानंतर यश आले.
सदर घटनेची माहिती तहसीलदार दीपक करंडे यांना देण्यात आली. यांच्या सुचनेवरून महसूल विभागाच्या अधिकाºयांच्या चुमने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय घटनेची नोंद घेतली. नुकसानग्रस्त शेतकºयाला तात्काळ शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.