चवताळलेल्या दोन माकडांचा कामगारावर हल्ला, पायाला गंभीर दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 11:52 AM2022-05-19T11:52:09+5:302022-05-19T12:07:04+5:30

प्राप्त माहितीनुसार शहरातील सय्यद साँ-मीलवर नंदकिशोर हुडे हे सकाळच्या सुमारास आपले दैनंदिन कामकाज करीत होते

Two chewed monkeys attack a worker, seriously injuring his leg in wardha selu | चवताळलेल्या दोन माकडांचा कामगारावर हल्ला, पायाला गंभीर दुखापत

चवताळलेल्या दोन माकडांचा कामगारावर हल्ला, पायाला गंभीर दुखापत

Next

वर्धा - शहरातील काही भागांत गेल्या काही दिवसांपासून माकडांनी धुमाकूळ घातला आहे. स्थानिकांच्या घरात घुसून ते वयोवृद्धांवरही अचानकपणे हल्ला करत आहे. विशेष म्हणजे वन विभागाचं याकडे सपशेल दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतेच, चवताळलेल्या माकडाच्या हल्ल्यात एक कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळीच घडली. शहरातील सय्यद साँ-मील परिसराती ही घटना असून नंदकिशोर हुडे (वय५४) असे जखमी कामगाराचे नाव आहे.
   
प्राप्त माहितीनुसार शहरातील सय्यद साँ-मीलवर नंदकिशोर हुडे हे सकाळच्या सुमारास आपले दैनंदिन कामकाज करीत होते. यावेळी, साँ-मीलच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन माकडांत तुंबळ युद्ध सुरू होते. त्याचवेळी नंदकिशोर यांनी प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यातील चवताळलेल्या दोन माकडांनी थेट त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्या त्यांच्या उजव्या पायाला गंभीर स्वरुपाची इजा झाली. त्यांना तत्काळ उपचारासाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर शासकीय रुग्णालय वर्धा येथे दाखल करण्यात आले. नंदकिशोर यांच्या उजव्या पायाला दोन ठिकाणी गंभीर जखमा असल्याने दहा टाके पडले आहेत. 

दरम्यान, सदर परिसरात माकडांचा मुक्त संचार असतो आणि अनेकजण माकडांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. माकडांच्या हल्ल्यात जखमी होण्याची ही तालुक्यातील 15 वी घटना असल्याचे यावेळी ग्रामीण रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या उपद्रवी माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 
 

Web Title: Two chewed monkeys attack a worker, seriously injuring his leg in wardha selu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.