सिंदीच्या विकासासाठी डिसेंबरपर्यंत दोन कोटी रुपये
By admin | Published: September 15, 2015 04:42 AM2015-09-15T04:42:35+5:302015-09-15T04:42:35+5:30
सिंदी (रेल्वे)च्या विकासाकरिता खासदार व आमदाराच्या विकासनिधीतून दोन कोटी रुपये देण्यात येणार असल्याची ग्वाही
वर्धा : सिंदी (रेल्वे)च्या विकासाकरिता खासदार व आमदाराच्या विकासनिधीतून दोन कोटी रुपये देण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी दिली. याच वेळी त्यांनी सध्याच्या आधुनिक युगात समाजाला निस्वार्थपणाने आनंद देण्याचा संकल्प या नंदी पोळा उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी करावा, असे आवाहनही केले.
सिंदी (रेल्वे) येथे नंदी पोळा उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री राजे अम्ब्रशीराव महाराज आत्राम, आ. समीर कुणावार, आ. डॉ. पंकज भोयर, वर्धा जिल्हा परिषद सदस्य राणा रणनवरे, सिंदी (रेल्वे)च्या नगराध्यक्ष सुनीता कलोडे, उपाध्यक्ष अशोक कलोडे, वर्धा नागरी सहकारी अधिकोषाचे संचालक अशोक जोशी, डॉ. शिरीष गोडे, किशोर दिघे, अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, वर्धेच्या उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, सिंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज शहा आदींसह महसूल, पोलीस आणि सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थित होती.