रिधोरा प्रकल्पात बुडून दोघांचा मृत्यू; दोघांचे मृतदेह काढले बाहेर
By आनंद इंगोले | Updated: December 10, 2023 22:46 IST2023-12-10T22:46:13+5:302023-12-10T22:46:27+5:30
आणखी किती विद्यार्थी होते याचा अजून थांगपत्ता लागला नाही.

रिधोरा प्रकल्पात बुडून दोघांचा मृत्यू; दोघांचे मृतदेह काढले बाहेर
आनंद इंगोले, आकोली (वर्धा) : नजीकच्या रिधोरा प्रकल्पावर गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी पाच वाजतादरम्यान उघडकीस आल्यावर शोधमोहीम सुरू झाली. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
रविवार हा सुटीचा दिवस असल्याने काही विद्यार्थी पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी रीधोरा प्रकल्पाच्या मागील बाजूस असलेल्या घोगरा धबधब्यावर गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यात सुजल बाबाराव अवथळे (१६)रा. उमरी ता.आर्वी आणि ओम अनिलराव धुर्वे (१७)रा. इंदिरानगर वर्धा असे मृतांचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सेलू पोलिसांनी तपास सुरू केला असून रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. या सोबत आणखी किती विद्यार्थी होते याचा अजून थांगपत्ता लागला नाही.