वाही, पिंपळझरी,पिंपळदरीवासियांचे दुष्काळाशी दोन हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:58 PM2018-04-11T23:58:57+5:302018-04-11T23:58:57+5:30

गारपीट आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पिंपळझरी, पिंपळदरी, वाही, वासी या गावातील नागरिकांनी त्यांच्या गावात पाणी टंचाई जाणवू नये याकरिता कंबर कसल्याचे मंगळवारी दिसून आले. या गावातील नागरिकांनी एकजुट दाखवून संभाव्य दुष्काळाशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी केली.

Two, hands, pimples, pimples | वाही, पिंपळझरी,पिंपळदरीवासियांचे दुष्काळाशी दोन हात

वाही, पिंपळझरी,पिंपळदरीवासियांचे दुष्काळाशी दोन हात

Next
ठळक मुद्दे६०० लोकवस्तीच्या गावात ६ हजार लोकांच्या ताकदीचे काम : तीन दिवसांत ८०० मिटर सीसीटीचे काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गारपीट आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पिंपळझरी, पिंपळदरी, वाही, वासी या गावातील नागरिकांनी त्यांच्या गावात पाणी टंचाई जाणवू नये याकरिता कंबर कसल्याचे मंगळवारी दिसून आले. या गावातील नागरिकांनी एकजुट दाखवून संभाव्य दुष्काळाशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी केली. गावकऱ्यांनी तिसºया दिवसापर्यंत ८०० मिटर सीसीटीचे काम पूर्ण केल्याचे दिसून आले.
मंगळवार स्पर्धेचा तिसरा दिवस. वैद्यकीय जनजागृती मंचाचे सदस्य डॉ. सचिन पावडे, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, आशिष पड्डलवार हे वाही या गावात श्रमदान करण्यास गेले होते. तिथे त्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. काही दिवसांपूर्वीच गारपिटीने संपुर्ण गावाचे भयंकर नुकसान झाले असताना वाही व वासी या गावांनी एकजुटीने संपुर्ण ताकदीने गावाजवळच्या टेकडीवर श्रमदान केले. स्पर्धेच्या तिसºया दिवशी त्यांनी जवळपास ८०० मिटर सीसीटीचे काम पूर्ण केले होते. पुढील कामाचेही नियोजन झालेले होते. गावात जवळपास १०० टक्के शोषखड्डे झले असून रोपवाटिकेमध्ये दीड हजार झाडांची लागवड झाली आहे. तसेच इतर जलबचतीचे उपक्रमांचेही नियोजन झालेले आहे. गारपिटीने या गावातील जवळपास सर्वच घरे क्षतिग्रस्त झालेली आहेत. तसेच काही घरे तर जमीनदोस्त झालेली आहेत. गावात पाण्याचा दुष्काळ असतानाही, हे गावकरी मात्र कुणावरही अवलंबून नाही. एकजुटीच्या ताकदिने दुष्काळाशी दोन हात करीत दररोज सकाळी श्रमदान सुरू आहे.
गावातील एकजुटीच्या ताकदीने साऱ्यांनाच धक्का
तीनही गाव मिळून लोकसंख्या अंदाजे सुमारे ६०० लोकसंख्या असलेल्या गावांतील लोकांचे बळ मात्र सहा हजारांचे आहे. हे येथे भेट दिल्यानंतर जाणवले. आसपासच्या स्वयंसेवी संघटनाचे श्रमदान तसेच शासकीय मदत आणि वनविभागाचे योग्य सहकार्य मिळाल्यास हे गाव निश्चितच पाणीदार होऊ शकते, असे मत पाणी फाऊंडेशनचे समन्वयक राम आंबोरे, गणेश गजकेश्वर, शंकर शिरेबंदी या ग्रामवासीयांनी मांडले. तसेच डॉ. सचिन पावडे यांनी गावकºयांची भेट घेऊन श्रमदानासाठी पाच कुदळ, पाच फावडे, १० घमेले, तसेच एक सब्बल भेटस्वरूप दिली. तसेच वॉटर कप स्पर्धेचे स्वरूप तसेच श्रमदानाचे महत्त्व पटवून दिले.

Web Title: Two, hands, pimples, pimples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.